मणिपुरातील हिंसाचार वांशिक हितसंबंधातून

    दिनांक :25-May-2023
Total Views |
वर्तमान
 
- डॉ. ज्ञानेंद्र बर्मन
1947 मध्ये, म्यानमारमध्ये 1 लाख कुकी वास्तव्याला होते. परंतु 1990 मध्ये ही सं‘या 40,000 पर्यंत खाली घसरली. हजारो कुकी लोक मणिपूर आणि मिझोराममध्ये स्थलांतरित झाले असावे, असा अंदाज आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मणिपूरची कुकी लोकसंख्या 1901 मधील 1 टक्क्यांहून 2022 मध्ये 29 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, तर मैतेईंची लोकसंख्या 1901 मधील 60 टक्क्यांवरून घटून 2022 मध्ये 49 टक्क्यांवर आली आहे. नागा लोकसंख्या देखील 1901 मधील 16 टक्क्यांवरून 2022 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली.
 
 
Manipur Violence : मणिपूर राज्य रत्नांची खाण म्हणून ओळखले जाते. पण मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार बघायला मिळत आहे. परस्परविरोधी वांशिक आचार-विचार आणि आकांक्षा यामुळे जातीय संघर्ष निर्माण झाला आहे. 3 मे 2023 रोजी झालेल्या हिंसक चकमकींमध्ये 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत 13 हजाराहून अधिक लोकांना हिंसक चकमकींमधून वाचवण्यात यश आले आहे. राज्य सरकारने मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवावी, असे निर्देश मणिपूर उच्च उच्च न्यायालयाने दिल्याचे निमित्त झाले आणि संघर्षाला तोंड फुटले. कुकी अतिरेकी गट मणिपूरच्या काही भागांमध्ये सक्रिय असून, वांशिक संघर्षात शस्त्रास्त्रांच्या झालेल्या बेधुंद वापरपामुळे परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे. (Manipur Violence) मणिपूरमध्ये विविध अतिरेकी गट सकि‘य असून, ते म्यानमारच्या काही भागात असलेल्या खुल्या सीमेचा फायदा घेत आहेत. कुकी लिबरेशन ऑर्गनायझेशन (केएलओ), कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन (केएनओ), युनायटेड नॅशनल लिबरेशन फ‘ंट ऑफ मणिपूर (युएनएलएफ), मणिपूर पीपल्स आर्मी (एमपीए), पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) आणि नॅशनल रिव्होल्युशनरी फ‘ंट ऑफ मणिपूर (एनआरएफएम) हे मणिपूरमध्ये कार्यरत असलेले काही अतिरेकी गट आहेत.
 
Manipur Violence
 
लोकसंख्येचे बिघडलेले समीकरण
22.527 किमीचे भौगोलिक क्षेत्र आणि 28 लाख 55 हजार 794 लोकसं‘या असलेल्या मणिपुरात ईशान्येकडील काही सर्वात लक्षणीय वांशिक समुदायांचे वास्तव्य आहे. त्यात मैतेई, नागा आणि कुकी हे प्रमुख वांशिक गट आहेत. 1901 मध्ये राज्याची लोकसं‘या 2 लाख 84 हजार 465 होती, त्यात गेल्या शतकात लक्षणीय वाढ झाली असून; राज्याची लोकसं‘या सध्या 28 लाख 55 हजार 794 पर्यंत पोहोचली आहे. राज्याच्या लोकसं‘येपैकी जवळपास दोन तृतीयांश लोक इंफाळ खोर्‍यात राहतात, जो एकूण भूभागाच्या केवळ 8.2 टक्के आहे. मैतेई लोक दर्‍या-खोर्‍यात राहणारे म्हणून ओळखले जातात. (Manipur Violence) खोर्‍यातील इंफाळ पश्चिम ब्लॉकमध्ये लोकसंख्येची घनता 1070 व्यक्ती प्रति चौ. किमी असून, इंफाळ पश्चिम ब्लॉकमध्ये ती प्रति चौ. किमीला 1,000 व्यक्ती अशी आहे. खोर्‍याच्या तुलनेत पहाडी जिल्ह्यांमध्ये लोकसं‘येची घनता कमी आहे. उदाहरणार्थ, चंदेल जिल्ह्याची लोकसं‘येची घनता 35 व्यक्ती प्रति चौ. किमी असून, तामेंगलाँग जिल्ह्याची लोकसं‘या घनता 25 व्यक्ती प्रति चौ.किमी आहे. सीमेपलीकडून संशयित अवैध स्थलांतरितांकडून वनक्षेत्र आणि इतर ठिकाणी होत असलेले अतिक‘मण चिंता वाढवणारे आहे. मणिपूरच्या विविध भागांमध्ये मिझोराम मार्गे म्यानमार आणि बांगलादेशातून आलेल्या बेकायदेशीर आणि अनोंदणीकृत स्थलांतरितांच्या होत असलेल्या वास्तव्यामुळे अनेक गावे आणि खेड्यांमध्ये अनैसर्गिक वाढ झालेली आहे.
 
 
मणिपूरची म्यानमारशी लागून असलेली 398 किमी लांबीची सीमा आहे. (Manipur Violence) मणिपूरच्या चंदेल, तेंगनौपाल, कामजोंग, उखरुल आणि चुराचंदपूर या जिल्ह्यांच्या सीमा म्यानमारशी जुळलेल्या आहे. 1947 मध्ये, म्यानमारमध्ये 1 लाख कुकी वास्तव्याला होते. परंतु 1990 मध्ये ही संख्या 40,000 पर्यंत खाली घसरली. हजारो कुकी लोक मणिपूर आणि मिझोराममध्ये स्थलांतरित झाले असावे, असा अंदाज आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मणिपूरची कुकी लोकसं‘या 1901 मधील 1 टक्क्यांहून 2022 मध्ये 29 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, तर मैतेईंची लोकसं‘या 1901 मधील 60 टक्क्यांवरून घटून 2022 मध्ये 49 टक्क्यांवर आली आहे. नागा लोकसं‘या देखील 1901 मधील 16 टक्क्यांवरून 2022 मध्ये 15 टक्क्यांपर्यंत घसरली. कुकी, नागांप्रमाणेच, निसर्गपूजक होते परंतु त्यांच्यापैकी बहुतेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणामुळे देशाचे विभाजन झाले. पूर्व पाकिस्तानात आणि नंतर बांगलादेशात चितगांव प्रर्वतीय क्षेत्रातील अनेक कुकी लोकांना छळाचा सामना करावा लागल्याने त्यांना मिझोराममध्ये आश्रय घ्यावा लागला. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्यास कुकी समाजाच्या हिताला बाधा पोहोचेल, या भीतीमुळे मणिपुरात हिंसाचार उफाळून आला. मणिपूर उच्च न्यायालयाने 27 मार्च 2023 रोजी राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या यादीत मैतेई समुदायाचा समावेश करण्याबाबत त्वरेने निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 आणि 21 नुसार राज्य सरकार मैतेईंच्या समतेने आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारांचे उल्लंघन करीत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करणार्‍यांचे म्हणणे आहे की, मैतेई लोकांनी प्रगत शिक्षण घेतले असून, एकदा का त्यांना अनुसूचित समाजाचा दर्जा मिळाला की, त्यांना बहुतांश सरकारी नोकर्‍या मिळतील. तथापि, एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, इतर काही समुदाय समृद्धी निर्देशांकात खूप पुढे आहेत.
 
 
2001 मध्ये (Manipur Violence) मणिपूरची एकूण लोकसं‘या 22.94 लाख होती. यापैकी 8.57 लाख (37.4 टक्के) वैध एसटी (अनुसूचित जमाती) लोकसंख्या होती. यामध्ये कुकी आणि नागांचा समावेश आहे. आदिवासी लोकसंख्यापैकी 8.31 लाख लोक ख्रिश्चन असून, आदिवासींमध्ये जवळपास 97 टक्के समाज ख्रिश्चन आहे. मणिपूरमध्ये अनुसूचित समाजाचे 25 आयएएस अधिकारी होते. हे सर्वजण ख्रिश्चन धर्मीय अनुसूचित जमातीचे होते. संपूर्ण ईशान्य भारतात, अनुसूचित जमातीतील 130 आयएएस अधिकारी होते. या 130 आयएएस अधिकार्‍यांपैकी 105 एसटी दर्जाचे ख्रिश्चन होते.
 
 
मैतेई हा (Manipur Violence) मणिपूरमधील सर्वात मोठा समुदाय आहे, जो राज्याच्या एकूण लोकसंख्याच्या जवळपास 53 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु त्यांनी एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या केवळ 8.2 टक्के इतकेच क्षेत्र व्यापले आहे. डोंगरी भागातील अनेक लोक, कुठलीही बंधने नसल्याने मैदानी भागात स्थायिक झाले आहेत. मणिपूरच्या एकूण लोकसं‘येच्या जवळपास आठ टक्के असलेल्या पांगल मुस्लिमांचेही मैदानी प्रदेशात वास्तव्य आहे. या सर्वांमुळे मैतेई लोकांच्या निवासाचे भौगोलिक क्षेत्रफळ आणखी कमी झाले आहे. मणिपूरच्या एकूण क्षेत्रफळाच्या 67 टक्के डोंगराळ भागात त्यांना जमिनीचा हक्क नाही. कलम 371(सी) अंतर्गत कुकी आणि नागा लोकांना डोंगरी भागात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कुकी आणि नागा लोक मैदानी भागात स्थायिक होऊ शकतात, परंतु मैतेई ना डोंगराळ भागात स्थायिक होऊ शकत ना त्यांना तेथे जमीन विकत घेण्याचे अधिकार आहेत.
 
 
मणिपूरबाबतच्या अनेक दंतकथा कुकी, नागा आणि मैतेई लोकांच्या समान उत्पत्तीचा शोध घेतात. बरेच जुने कुकी लोक अजूनही मैतेईंप्रमाणेच आपल्या कुळाचे नाव कायम ठेवतात. (Manipur Violence) अनेक नागा अजूनही त्यांच्या जुन्या परंपरेने ओळखले जातात आणि निसर्ग देवतांची पूजा करतात. मेैतेई लोक लेनिंगथौ सानामाही यांचा आदर करतात, जो सर्वोच्च देव याइबिरेल सिदाबा आणि सर्वोच्च देवी लीमरेल सिदाबी यांचा पुत्र आहे. सानामाही आणि लीमरेल यांची सर्व मैतेई लोक पूजा करतात. सर्व आदिवासी समुदाय त्यांच्या पूर्वजांची पूजा करतात, परंतु ख्रिश्चन धर्मात परिवर्तन झाल्यानंतर अनेक आदिवासी त्यांच्या पूर्वजांचा धर्म विसरले. ईशान्येसह देशभरातील अनेक आदिवासी संघटनांचे असे मत आहे की, ज्यांनी आपल्या जनजाती / आदिवासी प्रथा-परंपरांचा त्याग केला आहे, त्यांना कलम 342 नुसार अनुसूचित जमातीचा दर्जा मिळू नये. या लोकांना असे वाटते की, खर्‍या अनुसूचित जमातीच्या लोकांचे हक्क धर्मांतरित आदिवासींकडून हिरावून घेतले जात आहेत. ईशान्य भारतातील बर्‍याच लोकांनी परदेशी मिशनर्‍यांच्या प्रभावाखाली, त्यांच्या पूर्वजांचा आदिवासी धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.
 
 
तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवणे
2019 मध्ये (Manipur Violence) मणिपूर राज्याने 499 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र गमावले. 2017 ते 2019 या कालावधीत राज्याने 758 चौरस किलोमीटर वनक्षेत्र गमावले. त्यामुळे वनक्षेत्रातील अतिक‘मण आणि जंगलतोड ही गंभीर चिंतेची बाब झाली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग राज्यातील जंगलतोड, अफूची लागवड आणि अंमली पदार्थांच्या हैदोसासाठी म्यानमारच्या स्थलांतरितांना दोषी ठरवतात. जंगलातील काही भागात अफू पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. मणिपूरमध्ये खसखसीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असून, अंमली पदार्थांचा धोकाही वाढला आहे. हेरॉईनचा गैरवापर करणार्‍यांमध्ये (10.01 टक्के) मणिपूरचा देशात चौथा क‘मांक लागतो. मणिपूरच्या भावी पिढीला वाचवण्यासाठी ड्रग विरुद्ध युद्ध पुकारणे ही काळाची गरज आहे. अमली पदार्थांच्या विळख्यातून लोकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने काही पावले उचलली आहेत.
 
 
फूट पाडा आणि राज्य करा
मणिपूरचे भविष्य (Manipur Violence) मणिपुरींच्याच हातात आहे. मैतेई, कुकी आणि नागा हे येथील मुख्य निवासी आहेत. हे सर्व समुदाय ब्रिटीश वसाहतींच्या आगमनापूर्वी एकाच आईचे तीन पुत्र म्हणून एकोप्याने राहत होते. मैदानी आणि पर्वतीय भागात ब्रिटिशांच्या वसाहतींसाठी बांधकाम झाले होते. या सर्व समुदायांचे पूर्वज समान असून त्यांचा इतिहासही एकमेकांपेक्षा निराळा नाही. सर्वांनी बंधुभावनेने काम करण्याची आणि विभक्ततेचे अडथळे तोडून, परकेपणाच्या सर्व खुणा पुसून टाकण्याची गरज आहे.