वाघांच्या अधिवासात मजारींचे पीक

    दिनांक :25-May-2023
Total Views |
 जागर
 
- दिनेश मानसेरा
 
 
Tiger Habitat : गेल्या काही काळापासून उत्तराखंडमध्ये बेकायदेशीर मजारी, कबरींची झपाट्याने वाढ होत असून, प्रशासनाकडून त्या जमीनदोस्त केल्या जात असल्याच्या बातम्या ‘पांचजन्य’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध होत आहेत. दरम्यान, कॉर्बेट व्याघ‘ प्रकल्पात बेकायदेशीर कबरी बांधण्यासोबतच मृतदेह दफन करण्याचे प्रकारही वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे या जंगलात कब्रस्थानही बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या बेकायदा कबरींबाबत चुप्पी साधली आहे. खरे तर व्याघ‘ प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी याच दोन संस्थांच्या खांद्यावर आहे. या जबाबदारीमुळेच काही दिवसांपूर्वी या दोन्ही संस्थांनी परवानगी न घेता पर्यटन विश्रामगृहाचे बांधकाम केल्याप्रकरणी अनेक वन अधिकार्‍यांना तुरुंगाची हवा दाखविली होती. वास्तविक, एनटीसीएच्या परवानगीशिवाय कोणत्याही (Tiger Habitat) व्याघ्र प्रकल्पात एका विटेचेही बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे लोक विचारत आहेत की येथे कबरी कशा काय बांधल्या जात आहेत. एनटीसीची स्थापना काही वर्षांपूर्वीच झाली, हे मान्य केले, तरी त्याआधी प्रोजेक्ट टायगर ही केंद्र सरकारची संस्था येथे कार्यरत होती, तेव्हाही येथे व्याघ‘ संवर्धनाचे नियम लागू होते.
 
Tiger Habitat
 
‘पांचजन्य’च्या तपासात ढिकुली परिसरात कॉर्बेट व्याघ‘ प्रकल्पाच्या हद्दीत ‘कब‘स्थान’ बनवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे रामनगरमध्ये स्वतंत्र कब्रस्थान अस्तित्वात आहे. असे असताना ‘‘हे कब‘स्थान असून, ते स्वच्छ ठेवा, कचरा पसरवणार्‍यांकडून दंड वसूल केला जाईल,’’ असा मजकूर असलेला फलक झाडावर खिळ्यांनी ठोकून का लावण्यात आला आहे? हा दंड कोण वसूल करतोय? कॉर्बेट प्रशासन की कब्रस्थानातील लोक? कब‘स्थानातील लोक दंड आकारत असतील, तर त्यांना हे अधिकार कोणी दिले? कॉर्बेट प्रशासनाने त्यांची जमीन कब्रस्थानासाठी भाडेतत्त्वावर दिली आहे का? हे कब‘स्थान रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर जंगलाच्या आत आहे. (Tiger Habitat) कॉर्बेट प्रशासनाने जंगलात मृतदेह दफन करण्यासाठी आणि इतर अभ्यागतांना इस्लामिक रीतीरिवाज पूर्ण करण्यासाठी काही सूट दिली आहे का?
 
 
वाघांसह इतर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या अधिवासासाठी हे वनक्षेत्र जगा सर्वत्र ओळखले जाते. हे कब‘स्थान मनिहार जातीच्या मुस्लिमांनी बेकायदेशीरपणे बांधले असल्याची माहिती समोर आली आहे. ढिकुली ते बिनसर महादेवपर्यंत कुठे-कुठे मनिहार जातीचे मुस्लिम वास्तव्यास आहेत, असे परिसरातील लोक सांगतात. गत काही दिवसांत तबलिगी जमातीच्या लोकांची मनिहार मुस्लिमांकडील ऊठ-बस वाढली आहे. कदाचित हेच लोक कॉर्बेट (Tiger Habitat) व्याघ्र प्रकल्पात बेकायदेशीर कबरी आणि कब्रस्थान उभारण्यात सकि‘य असावेत. एका झाडाच्या खोडावर खिळ्यांनी टिनाचा फलक ठोकून आधीच त्यांनी एक बेकायदेशीर कृत्य केले आहे. कोणत्याही हिरव्यागार झाडावर खिळे ठोकून फलक लावू नयेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असताना अनेक ठिकाणी झाडांवर खिळे ठोकून फलक लावण्यात आले आहेत. ‘पांञ्चजन्य’ने उत्तराखंडचे वन्यजीव वॉर्डन डॉ. समीर सिन्हा यांच्याशी संपर्क साधून ढिकुली सीटीआर परिसरात बांधण्यात आलेल्या कब्रस्थानाबाबत माहिती घेतली असता, ते याबाबत अनभिज्ञ दिसले. खरे तर डॉ. सिन्हा काही वर्षांपूर्वीपर्यंत सीटीआरचे संचालक होते. असाच प्रश्न कॉर्बेट व्याघ‘ प्रकल्पाचे संचालक डॉ. धीरज पांडे यांना विचारला असता तेही आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ‘‘मला याबाबत काहीच माहिती नाही, मी हा काय प्रकार आहे, याची माहिती घेतो.’’
 
 
या प्रकारावरून वनक्षेत्र वाचवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच त्याबाबत पूर्णतः गाफील आहेत, असे स्पष्ट होते. त्यामुळेच वाघांच्या अधिवासावर कब्जा करून, तेथे कबरी व कब्रस्थान बांधले जात आहेत. या सगळ्यात एक चांगली बाब म्हणजे, सध्याचे राज्य सरकार अशा बेकायदा बांधकामांवर कडक कारवाई करीत आहे.
 
 
अधिकार्‍यांचे अनाकलनीय मौन
गेल्या काही वर्षांत काही भारतीय वन अधिकारी आणि इतर अधिकार्‍यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) परवानगीशिवाय कॉर्बेट व्याघ‘ प्रकल्पात बांधकामे करू दिली. जेव्हा या सर्व प्रकरणांची चौकशी झाली तेव्हा या अधिकार्‍यांना शिक्षा झाली. कॉर्बेटच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, कदाचित या मजारी आणि कबरी वन गुज्जरांनी बांधल्या असाव्यात. पण आता हे गुज्जर इथे राहत नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की गुज्जर ही जागा सोडून गेल्यावर, या मजारी आणि कबरींवर चादरी कोण चढवतोय्? ढेला पर्वतरांगेच्या वाटेवरील एका फलकावर ‘येथे पायी चालण्यास सक्त मनाई आहे’, असा मजकूर लिहिलेला आहे. एवढे सगळे करूनही तेथे मजारी बांधल्या जात आहेत. (Tiger Habitat) कॉर्बेट पार्क प्रशासनाने बिजरानी गेस्ट हाऊसजवळील मजारीसाठी विजेचे कनेक्शन दिले आहे. ढिकाळा विश्रामगृहाच्या पुढे एक मजार आहे आणि कलागड वनपरिक्षेत्रातही एक मजार आहे. झेला झिरणा विभागातही एक कबर आहे. सीटीआरचा सीमावर्ती भाग असलेल्या कॉर्बेट पार्क ढिकुली रोडवरही एक मजार आहे. रामनगर शहराला लागून असलेल्या कॉर्बेट हद्दीत एकंदरीत सात मजारी बांधण्यात आल्या आहेत. याबाबत वनाधिकार्‍यांचे मौन अनाकलनीय वाटते. कॉर्बेट पार्कला लागून असलेल्या रामनगर वनपरिक्षेत्रातही अनेक मजारी बांधण्यात आल्या आहेत.
 
कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प भारतातच नव्हे तर जगात वाघांच्या अधिवासासाठी ओळखला जातो. येथे कुणाचेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. येथे मजारी बांधल्या असोत की कब्रस्थाने, ती हटवावी लागतील. (Tiger Habitat) कॉर्बेट पार्कच्या अधिकार्‍यांनाही अशा अवैध बांधकांबाबत उत्तर द्यावे लागेल. कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाची प्रतिष्ठा राखली जायला हवी. पर्यटकांनी येथून कुठलाही वाईट अनुभव घेऊन परतू नये.
- पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड
 
 
येथील काही मजारी जुन्या आहेत. विभागाकडून या सर्व मजारींच्या बांधकामाचा आढावा घेतला जात आहे. त्या नियमानुसार उद्ध्वस्त केल्या जातील. कॉर्बेट (Tiger Habitat) व्याघ्र प्रकल्पात या मजारी कोणाच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या, याचीही चौकशी केली जाईल. त्यासाठी सॅटेलाइट छायाचित्रेही घेतली जातील.
- धीरज पांडेय, संचालक, कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प