मिग 29 के चे रात्री यशस्वी लॅण्डिंग

    दिनांक :25-May-2023
Total Views |
- भारतीय नौदलाची ऐतिहासिक कामगिरी
 
नवी दिल्ली, 
भारतीय नौदलाने नवी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रात्रीच्या अंधारात लढाऊ MiG 29 landing मिग 29 के या विमानाचे भर समुद्रात विमानवाहू जहाजावर प्रथमच यशस्वी लॅण्डिंग झाले. रात्रीच्या अंधारात यशस्वीरीत्या केलेल्या या कामगिरीमुळे नौदलाच्या कामगिरीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. नौदलाच्या माहितीनुसार, आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर मिग 29 के हे लढाऊ विमान यशस्वीरीत्या उतरले. आत्मनिर्भर भारताच्या अभियानानुसार ही नौदलाची मोठी कामगिरी असल्याचे नौदलाने म्हटले आहे. नौदलाच्या अधिकार्‍याने या ऐतिहासिक लॅण्डिंगचा व्हिडीओ ट्विटरवर सामायिक केला आहे.
 
 
MiG 29 landing
 
नौदलाने यापूर्वीच जाहीर केले होते की, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका आयएनएस विक‘ांतवर रात्रीच्यावेळी विमान उतरवणे हे आव्हान होते. पण यशस्वी ठरलेली ही कामगिरी आयएनएस विक्रांतवरील क्रू मेंबर्सची तसेच नेव्हल पायलट्सच्या प्रशिक्षित, उच्च व्यावसायिकता वाखाणण्याजोगी आहे. शनिवारी MiG 29 landing मिग 29 के युद्धनौकेवर उतरले. कारवार येथील नेव्हल बेसवर ही नौका तैनात होती. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या स्वदेशी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे लोकार्पण करण्यात आले होते. 40 हजार टनपेक्षा अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या सर्वाधिक सक्षम युद्धनौकांच्या यादीत आयएनएस विक्रांतचा समावेश झाला आहे.