विजयासह मुंबई इंडियन्सची क्वालिफायर 2 मध्ये एन्ट्री

मुंबईचा सामना शुक्रवारी गुजरातशी होणार

    दिनांक :25-May-2023
Total Views |
मुंबई,
Mumbai Indians : बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने लखनौविरुद्ध विजय मिळवला आहे. या करो किंवा मरोच्या सामन्यात मुंबईने लखनौचा 81 धावांनी पराभव केला. मुंबईसाठी आकाश मधवालने सामना जिंकून देणारी कामगिरी केली. त्याने पाच विकेट घेत मुंबईचा विजय निश्चित केला.

Mumbai Indians
 
या महत्त्वाच्या सामन्यात लखनौच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. या सामन्यात निकोलस पूरन आपले खातेही उघडू शकला नाही. या सामन्यात निकोलस पूरन गोल्डन डकचा बळी ठरला. मॅक्स स्टॉइनिस धावबाद झाला. या सामन्यात काइल मेयर्सची बॅटही चालली नाही. 13 चेंडूत 18 धावा करून काइल मेयर्स ख्रिस जॉर्डनचा बळी ठरला. मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्र ठरले. या विजयानंतर (Mumbai Indians) मुंबईचा सामना शुक्रवारी गुजरातशी होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 182 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौचा संघ अवघ्या 101 धावांत गारद झाला.
 
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने चौकार मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. नवीन-उल-हक पुढे जाऊन शॉट घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. आयुष बडोनीने रोहित शर्माचा जबरदस्त झेल घेतला. वेगाने जाणारा चेंडू आयुषने दोन्ही हातांनी पकडला. रोहित बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये निराशा दिसून आली. रोहित शर्मानंतर इशान किशननेही आपली विकेट गमावली. इशान किशन 12 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 15 धावा करून बाद झाला. यश ठाकूरने इशान किशनला यष्टिरक्षक निक्लॉस पूरनकडे झेलबाद केले. इशान किशन यंदाच्या मोसमात बॅटने विशेष काही करू शकला नाही.
 
मुंबईसाठी (Mumbai Indians) कॅमेरून ग्रीनने धडाकेबाज फलंदाजी केली. ग्रीनने 23 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावा केल्या. नवीन-उल-हकने ग्रीनला क्लीन बोल्ड केले. त्याचवेळी सूर्यकुमार यादव 20 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. नवीन-उल-हकने कॅमेरून ग्रीनला कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले.