जिल्ह्यात नांदगाव तालुका अव्वल

25 May 2023 21:01:24
तभा वृत्तसेवा
अमरावती,
Amravati Division : इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवार 25 मे रोजी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल 90.78 टक्के लागला असून 94.44 टक्क्यासह नांदगाव खंडेश्वर तालुका सलग दुसर्‍यांदा जिल्ह्यात अव्वल स्थानावर तर 94.14 टक्के निकालासह धारणी तालुका दुसर्‍या आणि तिवसा तालुका 84.99 टक्क्यासह तळाशी राहीला आहे. विभागात अमरावती जिल्हा पाचव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.63 टक्क्याने घसरला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा यंदाही अधिक आहे.
 
Amravati Division
 
अमरावती विभागीय (Amravati Division) मंडळाच्या अध्यक्ष निलीमा टाके, सचिव तेजराव काळे, सहसचिव संगीता पवार यांनी निकालाचा तपशील जाहीर केला. जिल्ह्यातल्या 14 तालुक्यातून 33 हजार 392 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 30 हजार 314 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 14 हजार 883 मुले तर 15 हजार 431 मुली आहे. अनुक्रमे 87.75 व 93.90 अशी त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. जिल्ह्यात अव्वल स्थानावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून 1 हजार 134 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी 1 हजार 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धारणी तालुक्यातून 2 हजार 2 पात्र होते. त्यापैकी 1 हजार 885 उत्तीर्ण झाले. चिखलदरा तालुक्यातून 1 हजार 658 पात्र विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 558 उत्तीर्ण झाले. चांदूर रेल्वे तालुक्यातून 1 हजार 157 पात्र विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 82 उत्तीर्ण झाले. चांदूर बाजार तालुक्यातून 2 हजार 320 पात्र विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 146 उत्तीर्ण झाले.
 
 
अंजनगाव सुर्जी (Amravati Division) तालुक्यातून 1 हजार 688 पात्र विद्यार्थांपैकी 1 हजार 541 उत्तीर्ण झाले. वरूड तालुक्यातून 2 हजार 318 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 108 उत्तीर्ण झाले. अमरावती तालुक्यातून 11 हजार 142 विद्यार्थ्यांपैकी 10 हजार 82 उत्तीर्ण झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातून 1 हजार 227 पात्र विद्यार्थांपैकी 1 हजार 112 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दर्यापूर तालुक्यातून 2 हजार 91 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 873 उत्तीर्ण झाले. अचलपूर तालुक्यातून 3 हजार 215 पात्र विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 860 उत्तीर्ण झाले. मोर्शी तालुक्यातून 1 हजार 723 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 521 उत्तीर्ण झाले. भातकुली तालुक्यातून 744 पात्र विद्यार्थ्यांपैकी 648 उत्तीर्ण झाले. तिवसा तालुक्यातून 973 पात्र विद्यार्थ्यांपैकी 827 उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक तालुक्याचा निकाल घसरला आहे.
 
 
90 टक्के गुण मिळविणारे कमी
इयत्ता बारावीच्या परीक्षेत 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेणार्‍यांची संख्या यंदा कमी झाली आहे. (Amravati Division) यंदा जिल्ह्यातले 2 हजार 124 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत 8 हजार 779, द्वितीय श्रेणीत 15 हजार 180 तर 4 हजार 231 विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झाले आहे.
 
 
श्रेणीसुधार व गुणसुधार योजना
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी व गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या दोनच परीक्षांमध्ये पुनःश्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. (Amravati Division) मार्च - एप्रिल 2023 च्या परीक्षेस प्रथमच नियमित विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेवून प्रविष्ट होणार्‍या) जुलै - ऑगस्ट 2023 व फेब्रुवारी - मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस ‘श्रेणी सुधार’ साठी प्रविष्ट होण्यास दोन संधी देण्यात येत येणार आहे. तसेच गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थांचे आभासी स्वरूपात अर्ज स्विकारण्यात येणार आहे. त्यासाठी 26 मे ते 14 जूनपर्यंतची मुदत आहे.
Powered By Sangraha 9.0