ऑनलाईन गेमिंगमध्ये चार हजार कोटींची हेराफेरी

    दिनांक :25-May-2023
Total Views |
- ईडीच्या कारवाईत उघडकीस आली गडबड
 
नवी दिल्ली, 
अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने विदेशात नोंदणी असलेल्या Online gaming ऑनलाईन गेमिंग पोर्टल्सवर देशभरातील 25 ठिकाणी छापे घातले. या कारवाईत ईडीने चार हजार कोटी रुपयांची हेराफेरी पकडली आहे. ईडीने विदेशी चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशात कार्यरत असलेल्या विदेशी नोंदणीकृत ऑनलाईन गेमिंग संकेतस्थळ आणि कंपन्यांवर देशातील विविध राज्यांमध्ये 25 ठिकाणी छापे घातले. यातून सुमारे चार हजार कोटी रुपयांची हेराफेरी पकडली आहे. हे पैसे बेकायदेशीररीत्या परदेशात पाठवले गेल्याचे उघडकीस आणले आहे.
 
 
online gaming
 
विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार केलेल्या या कारवाईदरम्यान 55 बँक खाती गोठवली तसेच 19.55 लाख रुपये आणि 2,695 डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जप्त केली आहे. ईडीकडून 22 आणि 23 रोजी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध‘प्रदेशमधील 25 परिसरांमध्ये झडती घेण्यात आली. या Online gaming ऑनलाईन गेमिंग कंपन्या आणि संकेतस्थळ कुराकाओ, माल्टा आणि सायप्रससार‘या छोट्या बेटांवर नोंदणीकृत असल्याचे आढळून आले. त्या सर्व बनावट व्यक्तींच्या नावाने उघडलेल्या भारतीय बँक खात्यांशी जोडलेल्या आढळून आल्या आहेत. या संदर्भात पुढील तपासणी सुरू असल्याचे ईडीच्या अधिकार्‍याने सांगितले.