प्रवीण सूद यांनी स्वीकारली सीबीआयची सूत्रे

    दिनांक :25-May-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
वरिष्ठ आयपीएस अधिकारी Praveen Sood प्रवीण सूद यांनी गुरुवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात् सीबीआयच्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. ते या पदावर दोन वर्षे कायम राहतील, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
 
Pravin Sood
 
मावळते संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी आपल्या कामाच्या शेवटच्या दिवशी येथील मुख्यालयात तपास यंत्रणेची सूत्रे Praveen Sood सूद यांच्याकडे सोपवली. सूद हे कर्नाटक कॅडरचे 1986 मधील तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. ते जयस्वाल यांच्यानंतरचे सर्वांच ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांच्या उच्चस्तरीय समितीने त्यांच्या नावाचा निर्णय घेतला होता.