सागवान टोळी जिल्ह्यातून तडीपार

    दिनांक :25-May-2023
Total Views |
- पोलिस अधीक्षकांनी दिले आदेश : गुन्हेगारांची उडाली भंबेरी

यवतमाळ, 
शहरात गुन्हेगारीमुळे सर्व सामान्याच्या डोक्याचा ताप वाढला आहे. मात्र, नव्यानेच रूजू झालेले पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या अवळल्या असून, गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिस विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’ आले आहे. शहरातील सराईत Teak tribe Tadipar सागवान टोळीला तीन महिन्याकरिता महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
 
 
Tadipar
 
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सागवान कुटुंबीय व त्यांचे पाठीराखे टोळीने परिसरात दहशत रहावी म्हणून गुन्हे करण्याचा अभिलेख आहे. यात प्रामु‘याने टोळीप्रमुख सलीम शहा सुलेमान शहा (वय 58 वर्षे), शहजाद शहा सलीम शहा (वय 32 वर्ष), शकील शहा सलीम शहा (वय 28 वर्ष), रा. सर्व राहणार अलकबीर नगर यवतमाळ यांचे गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात राहणारे नागरिकांना भय निर्माण झाले होते. त्यांनी सतत शरीराविषयक गुन्हे करण्याचे कृत्य करुन सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने या टोळीला महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 कलम 55 (1) अन्वये तडीपार करण्याबाबत प्रस्ताव पोलिस निरीक्षकांनी तयार करून हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक यांचेकडे पाठविला होता.
 
 
 
या प्रस्तावास हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षकांनी गुरुवार, 25 मे 2023 रोजी मान्यता देवून सागवान टोळीतील सदस्यांना जिल्ह्यातून 3 महिन्यांसाठी Teak tribe Tadipar  तडीपार करण्याचे आदेश पारित केले. आदेश प्राप्त होताच यवतमाळ शहर पोलिसांमार्फत सागवान टोळीतील टोळीला जिल्ह्यातून निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधीक्षक नंदकुमार पंत, जनार्धन खंडेराव, धनराज हाके, राजेश तिवारी, बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघट यांनी पार पाडली.