या ‘भवना'तील सूर निराळे...!

central vista हे क्षुद्र राजकारण आश्चर्यकारक !

    दिनांक :25-May-2023
Total Views |
अग्रलेख 
central vista राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेचा बेगडी मुद्दा पुढे करून केवळ राजकारणाकरिता नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याच्या काँग्रेस पुरस्कृत राजकारणामुळे देशातील विरोधकांच्या राजनीतीने किती खालची पातळी गाठली आहे, हे स्पष्ट झाले आहे. नव्या भारताच्या झळाळत्या यशाची साक्ष देणा-या आणि इतिहासातील पारतंत्र्याच्या उरल्यासुरल्या खुणा विसर्जित करून नव्या अभिमानाने उभ्या राहणा-या या तेजस्वी वास्तूचे उद्घाटन येत्या २८ तारखेला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनी पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. central vista देशाच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घटना आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा सोहळा पार पडणार हा खरे म्हणजे, प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारा अमृतयोग असताना, काँग्रेस आणि इतर काही राजकीय पक्ष मात्र स्वार्थी राजकारणापोटी आणि केवळ मोदी द्वेषापोटी या ऐतिहासिक सोहळ्यास बहिष्काराचे गालबोट लावण्यासाठी एकवटले, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेलच; पण त्याहूनही मोठे दुर्दैव म्हणजे, आपल्या क्षुद्र राजकारणामागचा कुटिल हेतू लपविण्यासाठी या पक्षांनी थेट राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेच्या मुद्याची ढाल पुढे केली आहे. central vista या राजकारणाचा बेगडी मुखवटा फाडून विरोधकांच्या ख-या चेह-यावरील राजकारणाचे कुटिल डाव उघडे पडू लागले आहेत.
 
 

modi 
 
 
राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेचा आणि लोकशाहीत सर्वोच्च समजल्या जाणा-या संविधानाचा दाखला देत, लोकशाहीचे सर्वोच्च श्रेष्ठ असे मंदिर समजल्या जाणा-या संसद भवनाच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा करणा-या काँग्रेसने याआधी राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेची कशी जाहीर खिल्ली उडविली होती आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नाईलाजाने सपशेल माफी मागण्याची वेळ काँग्रेसवर आली होती, हा इतिहास या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसजनांनी आठवावयास हवा. central vista गेल्याच वर्षी, जुलै महिन्यात संसद अधिवेशनाच्या काळातच काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींविषयी जे अनुदार आणि कुचेष्टेचे उद्गार काढले होते, त्याचा पुनरुच्चार करणेदेखील संविधानाचा आणि लोकशाहीचा आदर करणाèया कोणासही अवघड वाटेल. पण काँग्रेसने त्यावेळी त्याची तमा न बाळगता जीभ घसरल्याचे सपक समर्थन करत त्या अपमानकारक वक्तव्याची सारवासारव करण्याचा प्रयत्नदेखील केला होता. central vista याआधीही या देशाचे राष्ट्रपतिपद एका महिलेने भूषविले होते. त्यावेळी त्या पदावरील व्यक्ती महिला असेल तर तिला राष्ट्रपत्नी वगैरे म्हणावे का? असा अपमानकारक प्रश्न काँग्रेसला पडला नव्हता, पण मोदी सरकारच्या कार्यकाळात या पदावर प्रतिष्ठेने विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा करताना काँग्रेसच्या या नेत्याच्या जिभेचा लगाम सैल सुटला होता आणि या पदाच्या प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च संविधानिक पदावरील व्यक्तीच्या आदराचे सारे संकेत सहज झुगारण्याचे बेमुर्वत धाडस याच काँग्रेसच्या नेत्याने केले होते. central vista
 
 
आज राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेचा मुद्दा पुढे करून आपल्या क्षुद्र राजकीय अस्तित्वाची मूठ झाकलेलीच राहावी यासाठी त्याच काँग्रेसने अन्य विरोधी पक्षांसही वेठीस धरल्यागत सोबत घेऊन संसद भवनाच्या नव्या, शानदार वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचे क्षुद्र राजकारण करावे, हे आश्चर्यकारक आहे. विशेष म्हणजे, मोदीद्वेषाच्या विखाराने पछाडलेल्या अन्य विरोधकांनीही काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणास साथ देत आपल्या क्षुद्र राजकारणाचे दर्शन घडवून देशातील लोकशाहीच्या रथाचे दुसरे चाक किती खिळखिळे आहे, हेच दाखवून देण्याचा चंग बांधला आहे. central vista केवळ बेगडी विरोधाचा मुद्दा पुढे करून विरोध करताना विरोधकांनी आपल्या राजकारणाची पातळी दाखवून दिली आहे. असे म्हणतात की, या सोहळ्यावर बहिष्कार घालण्यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधकांनी जे काही एखादे दुर्बळ कारण पुढे केले असले, तरी खरी पोटदुखी आणि वेदना वेगळीच आहे. काँग्रेसच्या कोणत्याही घटनात्मक पदावर नसतानादेखील काँग्रेसचे सर्वोच्च नेते म्हणून ज्यांची जागा गांधी घराणेनिष्ठ काँग्रेसजनांच्या मनात कायम आहे, अशा राहुल गांधी यांना कोणत्याच नात्याने या सोहळ्यात मानाचे पान मिरविता येणार नाही आणि संसदेचे सदस्यत्वही गमावल्याने त्यांना या सोहळ्यास हजेरीदेखील लावता येईल किंवा नाही हे स्पष्ट नाही, म्हणूनच काँग्रेसमध्ये खरी बेचैनी आहे आणि त्या बेचैनीला राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेचा बेगडी मुलामा देऊन सोहळ्यास अपशकून करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, हे बहिष्कार अस्त्राचे खरे कारण असल्याचीही विरोधकांमध्येच चर्चा आहे. central vista
 
 
त्यामुळे देशाच्या जागतिक प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या, परंपरा आणि नवतेचा सुरेख संगम साधणा-या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालून राहुल गांधींच्या प्रतिष्ठेची झाकली मूठ कायम ठेवण्याचा काँग्रेसचा इरादा असावा, असेही बोलले जाते. central vista याआधी केवळ संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष व काँग्रेसचा नेता या नात्याने अनुक्रमे सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन केल्याचा आक्षेप समोर आल्यावर मात्र काँग्रेसी पाठीराख्यांना सारवासारव करावी लागली. याखेरीज, विरोधकांची सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था होण्याचे आणखीही एक कारण आहेच. central vista ते म्हणजे, केवळ स्वार्थी राजकारणापोटी आणि आपल्या पूर्वजांचे देशाच्या इतिहासातील महत्त्व अबाधित राखण्याच्या क्षुल्लक हेतूपोटी ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीची राहुल गांधी यांनी सातत्याने खिल्ली उडविली, ज्या सावरकरांचा सातत्याने अपमान करूनही त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी करण्याचे काँग्रेसचे सारे प्रयत्न धुळीस मिळाले त्याच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मदिनी या सोहळ्याचे आयोजन केल्याने काँग्रेसच्या दुख-या जखमेवर अधिक मीठ चोळले गेले आहे, असेही म्हटले जाते. central vista त्यामुळे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणा-या या प्रतिष्ठेच्या सोहळ्यास क्षुद्र राजकारणाचे गालबोट लावण्याचा आणि त्यासाठी संविधान किंवा देशातील सर्वश्रेष्ठ पदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या मुद्यास वेठीस धरणा-या विरोधकांची विश्वासार्हता लयास जाणार नाही ना, याची चिंता करण्याची वेळ विरोधकांवर येऊ नये!
 
 
central vista सेंट्रल व्हिस्टा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून पूर्ण झालेल्या या नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्यास आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे. येत्या रविवार, २८ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाèया या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासोबतच, ऐतिहासिक सेंगोलची प्रतिष्ठापनादेखील पंतप्रधानांच्या हस्ते लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी होणार आहे. १९४७ मध्ये देश सोडताना हाच सेंगोल जवाहरलाल नेहरू यांच्या हाती सुपूर्द करून इंग्रजांनी सत्तेचे हस्तांतरण केले होते. असे ऐतिहासिक महत्त्व असलेला आणि भारतीय स्वातंत्र्याच्या प्रतिष्ठेचे खरे प्रतीक असलेला हा राजदंड तेव्हापासून आजपर्यंत मात्र संसदेबाहेरच राहिला. त्याला पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन भारतीय गतवैभवाची नव्या भारताच्या तेजस्वी वाटचालीशी सांगड घालण्याचा अभिमानास्पद क्षण या निमित्ताने तमाम भारतीयांस अनुभवता येणार असताना, विरोधक मात्र या क्षणाचे साक्षीदार होण्याची टाळाटाळ करीत आहेत. central vista स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीकेचा मुद्दा अलगदपणे बासनात बांधण्याची वेळ राहुल गांधींवर आली होती. उद्या संसद भवन बहिष्काराची फळे पाहून त्यातूनही घुमजाव करण्याची वेळ आलीच, तर एकट्या काँग्रेसवर हे खापर फुटू नये, यासाठी ऐक्याची मोट बांधली जात असावी. central vista एकंदरच या भवनाच्या उद्घाटनाचे सूर काही निराळेच आहेत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.