वाशीम,
12th result फेब्रवारी - मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार, २५ मे रोजी दुपारी २ वाजता आभासी पद्धतीने जाहीर झाला असून, दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये वाशीम जिल्ह्याचा ९५.४५ टक्के निकाल लागला आहे. विभागात वाशीम जिल्हा अव्वलस्थानी आहे. वाशीम जिल्ह्यातून कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा व व्होकेशनल या शाखेतून १८ हजार ३९३ विद्यार्थ्यांनी परिक्षा प्रवेश अर्ज भरले. त्यात १८ हजार २१३ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यामध्ये प्रविण्य श्रेणीत ३७३४, प्रथम श्रेणीत ७६५१, द्वितीय श्रेणीत ४८८८ व पास श्रेणीत १११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालात दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींची उत्तीर्ण टक्केवारी मुलापेक्षा अधिक आहे. कला शाखेचा ९१.२२ टक्के, विज्ञान शाखा ९८.६९ टक्के, वाणिज्य शाखा ९५.४१ टक्के, व्होकेशनल ८५.५५ टक्के, टेनीकल सायन्स १०० टक्के निकाल लागला. रिसेाड तालुका निकालात अव्वलस्थानी असून, मालेगाव तालुका दुसर्या, वाशीम तालुका तिसर्या, मानोरा तालुका चवथ्या क्रमांकावर , मंगरुळनाथ तालुका पाचव्या तर एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेला कारंजा तालुका निकालात सहाव्या स्थानावर आहे.

वाशीम तालुयातून ४७६८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यामध्ये ४५९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुयाची निकालाची टक्केवारी ९६.३० टक्के आहे. रिसोड तालुयातुन ४९८१ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून, त्यात ४८२१ विद्यार्थी उतीर्ण झाले. रिसोड तालुयाची टक्केवारी ९६.३५ एवढी आहे. मंगरुळनाथ तालुयातूून २०५९ 12th result विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात १९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९३.३४ टक्के आहे. मालेगाव तालुयातून २२४९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून, २१६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ९६.३५ टक्के आहे. मानोरा तालुयातून १८८८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात १७८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुयाचा निकाल ९४.३३ टक्के आहे. कारंजा तालुयातून २४७२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात २२९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,तालुयाचा निकाल ९२.९२ टक्के आहे. बारावीच्या निकालात वाशीम जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर असून, दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलापेक्षा मुलींच वरचढ ठरल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.