हिरे व्यापारी झाला गोपालक!

gosewa गोमातांच्या गोमूत्रावर प्रयोग करण्यात आले

    दिनांक :25-May-2023
Total Views |
वेध
 
- प्रफुल्ल व्यास 
gosewa व्यक्ती ठरवून जन्म घेऊ शकत नाही. परंतु, ठरवून आपला मार्ग प्रशस्त करू शकते. देवाच्या उंबरठ्याकडे जाण्यासाठी संतमार्ग महत्त्वाचा असतो आणि हेच काम गुरू करतो, हा आध्यात्मिक मार्ग असला, तरी योग्य मार्ग दाखवणारा तो गुरू! आणि तोच गुरू सर्वात श्रेष्ठ असतो. gosewa मुंबईत परंपरागत हिरे व्यापारी असलेल्या बंधूंना गुरूने गोसेवेचा आदेश दिला आणि ते चक्क गुजरातेत पोहोचले. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर सुरू असलेल्या मार्गक्रमणात त्यांचे जीवन केवळ १५ वर्षांत यशस्वी झाले, असेच म्हणावे लागेल. गोहत्या बंदी कायदा आजही कागदावरच आहे. खुलेआम गोवंशाची कत्तल होते आहे. gosewa दुसरीकडे मात्र कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेले हिरे व्यापारी सुतारिया बंधू यांना त्यांचे गुरू हंसानंदतीर्थ स्वामी यांनी, ‘गाय आणि शेतकरी जोपर्यंत दु:खी तोपर्यंत देश आनंदी राहू शकत नाही,' असे सांगत गोसेवा करण्याचा मंत्र दिला आणि गुरू आज्ञा मानत दोन्ही बंधूंनी अहमदाबाद येथे बंशी गीर गोशाळेची स्थापना करून गोसेवेत तन-मन-धनाने झोकून दिले. gosewa
 
 
 
gosewa
 
 
gosewa त्याचे आज दृश्य स्वरूपात परिणाम दिसू लागले आहेत. १५ वर्षांत १८ गोत्राच्या ६०० गोमाता आहेत. विशेष म्हणजे येथील प्रत्येक गाईचे आणि त्यांच्या बच्चांचे बारसे होेते. नाव घेतल्यानंतर गोशाळेतील प्रत्येक गाय आणि तिचा बछडा बाहेर येतो. इथे गाईंची आरतीही केली जाते. बंशी गोशाळेच्या माध्यमातून गो आधारित आयुर्वेद, गो आधारित कृषी आणि गो आधारित शिक्षण दिले जाते. gosewa वेदांमध्ये श्याम कपिला, श्वेत कपिला, स्वर्ण कपिला, ताम्र कपिला सह गोमातेचे ११ विविध प्रकारांचे वर्णन असून प्रत्येक गोमातेच्या गव्यात विशेष औषधी गुणधर्म असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यात आले आहे. बंशी गोशाळेत आतापर्यंत ४५० गोमातांच्या गोमूत्रावर प्रयोग करण्यात आले. gosewa त्यात गोमूत्रात ५१०० प्रकार कम्पाऊंड असल्याचे निष्पन्न झाले. अ‍ॅलोपॅथीत जितकी पोेषक तत्त्वे आरोग्यासाठी आवश्यक समजली जातात ते सर्व गोमूत्राच्या प्राकृतिक रूपात आहेत. कॉपर, मॅगनिज, गंधक, स्टेरॉईड्स आदी आहेत. gosewa त्यामुळे पंचगव्य महाऔषधी आहेत हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.
 
 
५ लाखांपैकी १ विशेष गोत्राच्या गोमातेच्या पंचगव्यातून ३०० टक्के स्वर्ण क्षार मिळतो. ही महाऔषधी झाडांना टाकल्यास त्याची वाढ इतर औषधांच्या तुलनेत चांगली झाल्याचा दावा करण्यात आला आहे. gosewa जमिनीत मित्रजीवी किटाणू असतात. १९८० मध्ये केलेल्या १ ग्रॅम मातीत २ कोटीपेक्षा जास्त मित्र जीवाणू होते. रासायनिक खतांच्या अतिवापराने आज १ ग्रॅम मातीत फक्त ४० लाखच मित्र जीवाणू वाचले असल्याने जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. त्यावर उपाय म्हणून १ किलो सेंद्रिय गूळ आणि गावराणी गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक १ लिटर एकत्र मिश्रण तयार करून ते २ लाख लिटर पाण्यातून जमिनीत टाकल्यास मातीत मायक्रोफोक्स तयार होऊन माती सुपीक होत असल्याचा दावा या विद्यापीठाने केला आहे. gosewa या ‘गोकृपा अमृत'चा देशातील २२ राज्यांतील ६५ पिकांवर आणि १० प्रकारच्या मातीवर प्रयोग करण्यात आला असून त्याचे चांगले परिणाम मिळत असल्याने शेतकरीही आता या औषधांकडे वळत आहेत.
 
 
gosewa येथील विद्यापीठातून प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेसोबत आयुर्वेद, गोपालन, कृषी, संस्कृत इत्यादी विषयांसोबतच हवन विधीही शिकवला जातो. विद्यापीठात ६० विद्यार्थी आहेत. गो आधारित आयुर्वेदातून ५५ उत्पादने तयार केली जातात. यातून काही औषधे निर्माण करण्यात आली असून अनिद्रा, त्वचा रोग, मायग्रेन, पचन आदी १० प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय ठरले आहेत. बंशी गीर गोशाळेच्या माध्यमातून शेकडोंना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. gosewa येथील गोशाळेतील गाईंच्या दोनच स्तनांतून दूध काढले जाते. दोन स्तनांतील दूध त्यांच्या बछड्यांसाठी ठेवले जाते. याच गोशाळेतील गाईंसारख्या गाई इतर ठिकाणी तयार व्हाव्या यासाठी नि:शुल्क ‘नंदी सहयोग' उपक्रमही राबविला जात आहे. विशेष म्हणजे येथील एका नंदीला १६ कोटीत ब्राझील येथे विकत मागण्यात आले. परंतु, या बंशी गीर गोशाळेत ना गाय विकली जात ना नंदी! सर्व मार्गदर्शन मोफत. फक्त गाय आणि शेतकरी वाचावा यासाठीच! हिरे विकणा-या हाताने शेतक-यांचे सोनेच करण्याचा प्रयत्न म्हणावा.
९८८१९०३७६५