महाआघाडीत घटस्फोटाची लगबग !

politics in Maharashtra त्यांना ऐकून पब्लिक कंटाळली

    दिनांक :25-May-2023
Total Views |
प्रासंगिक
- मोरेश्वर बडगे
 
politics in Maharashtra लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होती. जागा वाटपाची चर्चा या दोघांत व्हायची. यावेळी दोन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे उबाठा अशा तीन पक्षांची महाआघाडी आहे. लोकसभा जागा वाटपात या तिघांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. politics in Maharashtra  तिन्ही पक्षांची ९ जणांची समिती जागा वाटप निश्चित करणार आहे. या समितीचा पत्ता नसताना तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. पळवापळवीही सुरू झाली आहे. त्यावरून धुसफूस वाढली आहे. महाआघाडी नावाची गाजराची पुंगी वाजणारच नाही, असे मानून तिघेही कामाला भिडले आहेत. politics in Maharashtra जास्तीत जास्त जागा लढायला कशा मिळतील, असा तिघांचा प्रयत्न आहे. त्यातून वेगवेगळी वक्तव्ये येऊ लागली आहेत. गेल्या वेळी ठाकरे गटाचे १८ खासदार निवडून आले होते. यातले १३ खासदार सध्या शिंदे गटात गेले असले, तरी ठाकरे गट या १८ जागांसोबत आणखी ३ म्हणजे एकूण २१ जागांवर हक्क सांगतो आहे. दोन्ही काँग्रेसला हा दावा पचलेला दिसत नाही. politics in Maharashtra अजित पवार यांनी आम्हीच मोठे भाऊ आहोत, असे म्हटल्याने काँग्रेसवाले अस्वस्थ आहेत.
 
 
 
politics
 
 
लोकसभेच्या महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. गेल्या वेळी ठाकरे गटाने १८, राष्ट्रवादीने ५ तर काँग्रेसने १ जागा जिंकली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना फुटली. ठाकरे गटाकडे फक्त ५ खासदार उरले आहेत. त्यामुळेच जागा वाटपाचा मुद्दा कळीचा झाला आहे. महाआघाडीत सारे पक्ष समसमान आहेत असे शरद पवार म्हणाले खरे; पण समसमान म्हणजे १६-१६-१६ जागा. मात्र, हे सूत्र कोणालाही मान्य नाही. politics in Maharashtra पाच वर्षांपूर्वीच्या निकालाच्या आधारावर आज जागा वाटप करायला काँग्रेस तयार नाही. गेल्या वेळी आमचा एकच म्हणजे चंद्रपूरचा उमेदवार निवडून आला होता. मात्र, आता आमची ताकद वाढली आहे. कर्नाटकचा निकाल त्याची साक्ष आहे, असे काँग्रेसवाले सांगत आहेत. गेल्या वेळी काँग्रेसने २६ तर राष्ट्रवादीने २२ जागा लढवल्या होत्या. २० पेक्षा जास्त जागा लढवणारे हे दोन्ही पक्ष २० पेक्षा कमी जागा मान्य करायला तयार नाहीत. निवडून येऊ शकेल त्या पक्षाला ती जागा द्यावी, असाही फॉर्म्युला समोर आला आहे. politics in Maharashtra पण कोण कुठून निवडून येईल हे कोण ठरवणार? नाजूक मुद्दे आहेत. तब्बल २३ जागांवर वाद आहे. एकमत कसे होणार? जागा वाटपाची चर्चा जसजशी पुढे सरकेल तसतशी कटुता वाढलेली असेल. हेच होणार होतं आणि हेच होणार.
 
 
नियती उद्धव ठाकरे यांना याच जन्मी हिशोब चुकता करायला सांगते आहे. politics in Maharashtra उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सल्ल्याने चालले. संजय राऊत यांच्या आहारी गेले. या दोघांनी उद्धव यांना अवघ्या तीन वर्षांत रस्त्यावर आणून सोडले आहे. सहकारी आमदारांना विश्वासात घेऊन उद्धव चालले असते तर ही पाळी आली नसती. पण अहंकाराने घात केला. सापनाथ-नागनाथ जवळ केल्याने हक्काचा एकनाथ दूर गेला. politics in Maharashtra शिवसेनेत बंड झाले. अवघ्या ११ महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर पक्की मांड बसवली आहे. उद्धव आज कुठेही नाहीत. कालपर्यंत ते स्वत:ला महाआघाडीचा सर्वोच्च नेता मानत होते. आज जागा वाटपाचा प्रश्न आला तर दोन्ही काँग्रेसवाले त्यांना खिजगणतीतही मोजायला तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे ताजे वक्तव्य पाहा. दादा म्हणाले, आम्ही मोठे भाऊ. काँग्रेस धाकटा भाऊ. उद्धव यांच्या उबाठाचा अजितदादांना चक्क विसर पडला. उद्धव यांच्या उबाठाला दादा तिसरा भाऊही मानायला तयार नाहीत. तेच खरे कटु वास्तव आहे. उद्धव डरकाळ्या खूप फोडतात; पण त्यांच्याकडे आज उरले आहे काय? politics in Maharashtra १८ खासदार होते. त्यातले १३ खासदार शिंदे गटात निघून गेले. ५६ आमदार होते. त्यातले ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. जेमतेम ५ खासदार आणि १५-१६ आमदार उबाठाकडे उरले आहेत.
 
 
१६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय येऊ द्या. उबाठा सेना रिकामी होईल. आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असा दावा उद्धव करतात. उरलेसुरले शिवसैनिक टिकवण्यासाठी उद्धव यांना तसे बोलावे लागते. मुळात उरली आहे ती शिल्लक सेना. politics in Maharashtra शिल्लक माणसाला खरकटेच मिळत असते. अजितदादा आम्हीच मोठे भाऊ आहोत, असे म्हणताहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा करीत आहेत. तुम्ही लिहून ठेवा; दोन काँग्रेसच्या हाणामारीत उरतील त्या जागा उद्धव यांच्या वाट्याला येतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकू  शकत नाहीत त्या जागा उद्धव यांच्या माथी मारल्या जातील. त्यावर उद्धव आदळआपट करतील. politics in Maharashtra पण आरडाओरडा करून करून किती करणार? पदरात पडतील तेवढ्या जागा घेण्यापलीकडे उद्धव यांना पर्याय नाही. कसबा आणि चिंचवडवरही उद्धव यांनी दावा सांगितला होता; पण जमले नाही. आताही मनाजोगे जमणे नाही. उद्धव आज अशा जागी पोहोचले आहेत की, या क्षणी आघाडी सोडून जाणे त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरेल. politics in Maharashtra महाआघाडीचे जागा वाटप कुठल्या दिशेने चाललंय ते लक्षात घ्या. ते दिवस दूर नाहीत जेव्हा संजय राऊत अखेरची एन्ट्री मारतील. २१ जागा हा धर्मसिद्ध हक्क आहे, असे डोळे फिरवत सांगतील. कटुता वाढेल. एक दिवस असा उगवेल की, महाआघाडी तुटल्याचे अजितदादा-पटोले जाहीर करतील.
 
 
politics in Maharashtra आपले अवतारकार्य पूर्ण झाल्याच्या आनंदात संजय राऊत म्हणतील, उखाड दिया. तोड के दिखाया... हे ऐकून उद्धव स्वतःला मातोश्रीत कोंडून घेतील. शरद पवार समजूत काढायला येतील, याची वाट पाहतील. पण शरद पवार येणार नाहीत. हे दिवस पाहण्यासाठीच तर पवारांनी उद्धवना भाजपपासून तोडले होते. पवारांना शिवसेना संपवायची होती. ती त्यांनी संपवली. राऊत यांना मदतीला घेऊन गेम केला. politics in Maharashtra आपल्याला खूप राजकारण कळते या भ्रमात उद्धव राहिले. आता कितीही वज्रमूठ सभा गाजवल्या तरी उपयोग नाही. उद्धव यांची स्थिती सध्या पंक्चर झालेल्या टायरसारखी आहे. उद्धव, आदित्य, राऊत यांना ऐकून पब्लिक कंटाळली आहे. लढायला दुसरे आहे कोण? महाआघाडी भक्कम आहे, आम्ही एकत्र लढणार असे आघाडीचे नेते कितीही सांगत असले, तरी त्यात दम नाही. politics in Maharashtra राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच मारामा-या सुरू आहेत. प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने बोलावले तेव्हा सर्वांनी त्यांना फोन करून धीर दिला. मात्र, अजितदादांचा फोन गेला नाही. हे तथाकथित नेते आपसात भांडून संपणार. पुढचे वर्ष निवडणुकांचे आहे. कोर्टात अडकलेल्या महापालिका निवडणुकाही लोकसभा निवडणुकीच्या आसपासच लागतील. politics in Maharashtra कोण कोणाशी लढतंय तेच कळणार नाही. भाजपला चिंतेचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिस-यांदा येत आहेत.