भारतीय अर्थव्यवस्था जी-20 समूहात वेगाने वाढणारी : मूडीज

    दिनांक :25-May-2023
Total Views |
-नोकरशाहीवर नियंत्रण गरजेचे
 
नवी दिल्ली, 
जगातील अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाच भारतीय अर्थव्यवस्था मात्र जोशपूर्ण वातावरणात उत्साह आणि वेगाने घोडदौड करत आहे. केवळ सरकारी आकडेवारीच त्याचा पुरावा देत नसून विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचे आर्थिक वर्चस्व मान्य केले आहे, असे rating agency Moody's क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने स्पष्ट केले. भारताचा जीडीपी 2022 मध्ये 3.5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक होता. तर, पुढील पाच वर्षांपर्यंत हा देश जी-20 समूहातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल.
 
 
moodys
 
निर्मिती (मॅन्युफॅ क्च्युरिंग) आणि पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर) क्षेत्रात 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. असे असले तरी ही क्षमता 2030 पर्यंत शेजारच्या चीनपेक्षा कमी राहणार असल्याचा दावाही मूडीजने केला आहे. भारताच्या काही धोरणांमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यावर परिणाम होईल. भ‘ष्टाचारावर नियंत्रण, आर्थिक धोरणांमध्ये बदल, कर वसुली आणि प्रशासनाला अधिक गतिमान करण्याचे प्रयत्न उत्साहपूर्ण असल्याचेही मूडीजने म्हटले आहे. 
 
 
दरम्यान, मूडीजने आपल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाची तारीफ केली असली तरी या घोडदौडीत नोकरशाही अडथळे निर्माण करत असल्याचा ठपकासुद्धा ठेवला आहे. निर्णय घेण्याच्या प्रकि‘यांमध्ये नोकरशाहीचा निरुत्साह भारतात विदेशी गुंतवणूक आणण्याच्या वेगाला अवरुद्ध करू शकतो. भारताला संबंधित अडथळे दूर करण्याची नितांत गरज असल्याचेही rating agency Moody's मूडीजने स्पष्ट केले आहे.