दोन चंदन तस्कर पोलिसांच्या ताब्यात

25 May 2023 21:08:47
तभा वृत्तसेवा
अचलपुर, 
तालुक्यातील सरमसपुरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या निजामपूर येथील स्मशान भूमितील (sandalwood smuggler) चंदनाची झाडेकापून नेण्याच्या बेतात असलेल्या दोन आरोपींना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अटक केली आहे.
 
sandalwood smuggler
 
माहितीनुसार, निजामपूर, (sandalwood smuggler) सुलतानपुरा रस्त्यावरील स्मशानभूमित रात्रीच्या वेळेस गस्तीवर असणार्‍या पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदपणे फिरताना दिसला. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांला ताब्यात घेतले. लगेच निजामपूर मार्गावरील स्मशानभूमिजवळ त्याला नेले असता त्याचा साथीदार एक मोटरसायकल घेऊन आढळला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्यात त्यांनी आरीच्या साह्याने चंदनाचे झाडे कापलेली दिसली. पोलिसांनी आणखी चौकशी केली असता चंदनाची झाडे तोडण्याची कबुली त्यांनी दिली. चंदन लाकूड व दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. कमलेश कमल उईके (वय 22 वर्ष, रा. मुंडापार, मुलताई) व रामदास पतिराम वटकर (वय 46 वर्ष, रा. सातनुर) असे आरोपींची नावे आहेत. ठाणेदार शहाजी रुपनर, संजय विखे, आशितोष तिवारी, नारायण दांडेकर तपास करीत आहे.
Powered By Sangraha 9.0