‘टॉवर ऑफ लंडन’च्या प्रदर्शनात ठेवणार कोहिनूर हिरा

25 May 2023 21:00:05
लंडन :
भारताने दावा केलेला Kohinoor diamond कोहिनूर हिरा शुक्रवारी टॉवर ऑफ लंडन येथे विजयाचे प्रतीक असलेल्या नवीन प्रदर्शनात सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. कोहिनूर, ज्याला कोह-इ-नूर म्हणूनही ओळखले जाते, तो पर्यटकांच्या आकर्षणाच्या ठिकाणी नवीन ज्वेल हाऊस येथे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
 
 
Kohinur
 
या हिर्‍याचा जगभरातील प्रवास अधोरेखित करणारा व्हिडीओही दाखविण्यात येणार आहे. Kohinoor diamond कोहिनूरला वर्षानुवर्षे सुशोभित केलेल्या विशिष्ट शाही दागिन्यांना जोडलेली नावे हिर्‍याचा इतिहास स्पष्ट करतात. ब्रिटनच्या राजवाड्यांचे व्यवस्थापन करणार्‍या हिस्टोरिक रॉयल पॅलेसेसच्या (एचआरपी) प्रवक्त्याने सांगितले की, नवीन प्रदर्शनात कोहिनूरसह अनेक वस्तूंचा सहभाग राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0