पोलीस उपनिरीक्षकाची न्यायाधीशाला शिवीगाळ, व धमकी

ठाणेदारावर गुन्हा दाखल करून निलंबित.

    दिनांक :26-May-2023
Total Views |
गडचिरोली जिल्ह्यातील खळबळजनक घटना
गडचिरोली,
Police sub-inspector न्यायालयाने आपल्या विरोधात निकाल दिल्याने संतप्त पी एस आय ने न्यायाधीशाच्या बंगल्यावर जाऊन शिवीगाळ करून मारहाण करीत धमकी दिली. अशी तक्रार न्यायाधीशाचे वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रार गडचिरोली पोलिसांनी चामोर्शी पोलीस ठाण्याला वर्ग केली आहे. चामोर्शी चे पीएसआय राजेश खांडवे असे आरोपीचे नाव असून अद्याप त्याला पोलिसांनी अटक केली नसल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी बुधवारी दिले.
 
 
police
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. त्यापैकी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिलला होती. Police sub-inspector त्यासाठीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल ही होती. त्याच दिवशीच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व जोड्याने मारहाण केल्याचा आरोप त्या निवडणुकीतील एक उमेदवार आणि सभापती अतुल गण्यारपवार यांनी केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली होती. शिवाय तशी तक्रारही गण्यारपवार यांनी केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२३, ४२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मे रोजी दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पोलिस प्रशासन सत्र न्यायालयात दाद मागण्याचा तयारीत असतानाच पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडवे हे गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास न्यायाधीशाच्या बंगल्यावर गेले आणि आत घुसून न्याधीशांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. Police sub-inspector या घटनेची व्हिडिओग्राफी न्याधीशांच्या बंगल्यावर असलेल्या शिपायाने केली. त्या आधारावर न्याधीशांच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गडचिरोली पोलिसांनी या संदर्भात कुठलीही माहिती देण्यास नकार देत सदर तक्रार चामोर्शी पोलीस ठाण्याला वर्ग केली असल्याचे सांगितले. सदर पोलीस निरीक्षक खांडवे यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एखादा पोलीस उपनिरीक्षक आपल्या विरोधात निकाल गेला म्हणून न्यायाधीशांना शिवीगाळ, मारहाण करीत धमकी देण्यापर्यंत मजल मारण्याची हिंमत करीत असेल तर सामान्य माणसाचे काय असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.