अन् नाला सरळीकरणाला झाली सुरुवात

    दिनांक :26-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
straightening of drain शहराला लागून असलेल्या नाल्याद्वारे शहरातील सांडपाणी वाहते. नाल्यातील पाणी सरळ न वाहता रहिवासी भागाकडील रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत असल्याने या भागातील नागरिकांना धोक्याचे होते. त्यामुळे संबंधित बाबीची माहिती जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे यांना मिळताच त्यांनी २४ मे रोजी प्रत्यक्षात घटनास्थळी पाहणी करून यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना नगरपरिषद मुख्याधिकारी यांना केली. नगरपरिष प्रशासनाने ही याची दखल घेत गुरुवार २५ मे रोजी कामाला सुरुवात केली. गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचुरटोला, फुलचुर व गोंदिया शहराच्या मध्यभागातून नाला वाहतो. फुलचुर नाक्यापासून छोटा गोंदिया व चुलोदकडे वाहून जाणाऱ्या नाल्याच्या काठाजवळ नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. याच भागात रामदेव कॉलनी आहे. मागील काही वर्षांपासून नालाचा उपसा न झाल्याने नाल्याच्या मधोमध भूभाग असल्याने शहराचे सांडपाणी व पावसाचे पाणी वाहत असताना त्याचा प्रवाह दिवसेंदिवस रहिवासी भागाकडे वळत होते.
 
 
goindiya
 
त्यामुळे या भागातील ३० फुटाचा रस्ता १० ते १२ फूटपर्यंत कमी झालेला आहे. straightening of drain त्यामुळे या भागातील नागरिकांनी धोका होण्याची संभावना नाकारता येत नाही करिता भविष्यातील दुर्घटना टाळण्याकरिता लोखंडी खांब लावलेले आहेत. पावसाळा सुरू होणार असून पुराचे पाणी या वसाहतीत शिरण्याची शक्यता पहाता येथील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांना सदरबात निदर्शनास आणून दिली त्यांनी तत्काळ २४ मे रोजी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सदर नाला शहराला लागून असल्याने व नगरपरिषदेच्या हद्दीला लागून असल्याने गोंदिया नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी करण चव्हाण यांच्याशी संपर्क साधून घटना स्थळावर सबंधित विभागाच्या कर्मचारी यांना नाला उपसा करून सरळीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
 
 
२५ मे रोजी सकाळपासून या कामाला सुरुवात करण्यात आल्याने या भागातील रहिवासी यांनी संजय टेंभरे यांचे आभार मानले. विशेष म्हणजे पूर प्रतिबंधक योजनेच्या माध्यमातून या भागात हवे त्या ठिकाणी सुरक्षा भिंत तसेच नाला सरळीकरण व नाला उपसा करण्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे टेंभरे यांनी सांगितले. दरम्यान टेंबरे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत पाहणे केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या भारती गावंडे, मिठाईलाल चक्रवर्ती, ईश्वर चक्रवर्ती, महेंद्र शहारे, लोकेश उपराडे, महेश माधवानी, देवलाल पटले, हेमेंद्र टेंभरे, नाना मेश्राम, सुरेंद्र बागडे आदी उपस्थित होते.