तभा वृत्तसेवा
भंडारा,
आयपीएल क्रिकेट IPL gambling सामन्यावर जुगार खेळविला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर परिसरात धाड टाकली. यावेळी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा पसार झाला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या पथकाने 26 मे रोजी भंडारा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गणेशपूर परिसरात ही कारवाई केली. IPL gambling यावेळी आरोपी प्रवीण रमेश बावनकर (वय 30) व फरार आरोपी मनोज नवखरे (वय 35) दोन्ही रा. गणेशपूर हे इंडियन प्रिमीअर लिगच्या मुंबई इंडियन्स विरूध्द गुजरात टायटन या संघाच्या क्रिकेट सामन्यावर लोकांकडून पैसे घेऊन बेटिंगचा जुगार खेळ खेळतांनी मिळून आले. प्रसंगी आरोपी प्रविण बावनकर याच्याकडून 2 मोबाइल, रोख 3700 रुपये व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 38 हजार 710 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलिस स्टेशन भंडारा येथे कलम 12 (अ) म.जु.का. सहकलम 109 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.