तिरुअनंतपुरम,
dress code केरळच्या कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने (CUSAT) पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याअंतर्गत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पँट-शर्ट किंवा चुळीदारपासून काहीही घालण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी नुकत्याच दिलेल्या आदेशात यासंदर्भात विद्यार्थ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे. आतापर्यंत CUSAT अंतर्गत, स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या मुलांना शर्ट आणि पँट आणि मुलींना चुळीदारा घालावी लागत होती.

नवीन आदेशानुसार, dress code मुले आणि मुली दोघांनाही शर्ट-पँट किंवा चुळीदार घालण्याचा पर्याय असेल. विद्यापीठाच्या संयुक्त कुलसचिव शोभा एस यांना लिहिलेल्या पत्रात, स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले की नवीन सूचना 1 जून 2023 पासून लागू होतील. सध्याच्या गणवेशाचा रंग न बदलता जेंडर न्यूट्रल गणवेश स्वीकारण्याचे आदेश कुलगुरूंनी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगला दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. CUSAT च्या SFI (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नमिता जॉर्ज यांच्या नुकत्याच झालेल्या निवेदनावर विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. नमिता म्हणाल्या की, अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम शिकणाऱ्या 2,000 हून अधिक नियमित विद्यार्थ्यांना या नवीन आदेशाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला CUSAT ने महिला विद्यार्थ्यांना 'मासिक पाळीची रजा' दिली होती. त्याअंतर्गत प्रत्येक सेमिस्टरमध्ये विद्यार्थिनींच्या उपस्थितीत दोन टक्के अतिरिक्त सूट दिली होती.