25 कोटींच्या निधीतून होणार हिंगणघाट रेल्वे स्थानकाचा कायापालट

29 May 2023 20:18:00
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
Hinganghat railway station : अमृत भारत योजनेंतर्गत हिंगणघाट रेल्वे स्थानकाच्या विकासाकरिता 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या काळात हिंगणघाट रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आज सोमवार 29 रोजी चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस थांब्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. कोरोना काळात बंद झालेल्या झालेल्या रेल्वे गाड्यांपैकी 3 रेल्वे गाड्यांचे थांबे हिंगणघाट येथे सुरू करण्यात आले. चेन्नई जयपूर एक्सप्रेस या गाडीचे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्यानंतर आता आज सकाळी 9 वाजता प्रथम आगमन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महामंत्री किशोर दिघे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी
 
Hinganghat railway station
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले, भाजपा शहर अध्यक्ष आशिष पर्वत, रेल्वेचे अधिकारी खैरकार व श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. 25 कोटी निधीतून फुट ओव्हर ब्रिज, लिफ्टची सुविधा, आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण, रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठे शेड तसेच विविध प्रकारच्या सोयी सुविधांसह हिंगणघाट रेल्वेस्थानकाचा विकास होणार आहे, रेल्वे प्रशासनाकडे बुटीबोरी ते जाम समुद्रपूर ते नंदोरी असा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला असून त्याकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली. गाड्यांचे थांबे व्हावे याकरिता अनेक वेळा आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांचासुद्धा सत्कार केला.
 
 
हिंगणघाट रेल्वेस्थानकावर (Hinganghat railway station) चेन्नई जयपूर एक्सप्रेसचे 9.15 वाजता आगमन झाल्यावर खा. तडस यांनी रेल्वे चालकाचा सत्कार केला. यावेळी खा. तडस यांचा भाजपा महिला मोर्चा, भाजयुमो, नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रेल्वेचे अभय पुनवटकर यांनी केले. भाजपच्या वतीने खा. तडस यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महामंत्री किशोर दिघे, प्रेम बसंतानी, भाजप तालुका अध्यक्ष संजय डेहणे, आकाश पोहाणे यांची उपस्थिती होती. हिंगणघाटला रेल्वे गाड्यांचे थांबे मिळावे याकरिता अथक परिश्रम घेणार्‍या वर्धा बल्लारशाह यात्री संघाचे संघाचे विजय मुथा, राजेश कोचर यांचेसह पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. प्रास्ताविक प्रा. किरण वैद्य यांनी केले. संचालन भाजपा शहर अध्यक्ष आशिष पर्बत यांनी केले तर आभार अनिल गहिरवार यांनी मानले.
 
Powered By Sangraha 9.0