ज्येष्ठ लेखिका डॉ. सुनीती देव यांचे निधन

03 May 2023 11:39:48
नागपूर,
ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव Suniti Dev यांचे मंगळवारी आजारपणामुळे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा अभिजित, सून वृषाली देशपांडे, नात आणि आप्तपरिवार आहे.
 
 

dfgv 
 
 
डॉ. देव Suniti Dev या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी अमरावती येथील तत्कालिन विदर्भ महाविद्यालय येथे सेवा दिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. डॉ. देव यांचा नागपूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय वावर होता. नागपूर शहरातील वाहतूक नियंत्रणाबाबत काम करणाऱ्या जनआक्रोश संघटनेच्या त्या सदस्य होत्या. याशिवाय, आजच्या सुधारक या नियतकालिकाच्या संपादक मंडळातही त्या होत्या. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातही त्यांता सहभाग होता. डॉ. सुनीती देव या सामाजिक विषयांबद्दल अत्यंत जागरुक होत्या. या ‌विषयावर त्यांनी सातत्याने लेखन केले होते. 3 मे रोजी श्रीविनायक अपार्टमेंट, बाल जगत, लक्ष्मीनगर येथील त्यांच्या राहत्या घरून सकाळी 11.30 अंत्ययात्रा निघेल. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
Powered By Sangraha 9.0