वर्धा जिल्ह्यातील सिंदीत विमानतळाचा प्रस्ताव

31 May 2023 18:27:54
वर्धा,
Sindit Airport वर्धा जिल्ह्यातून गेलेला समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग व प्रस्तावित द्रायपोर्ट लक्षात घेता सिंदी रेल्वे येथे विमानतळ निर्माण करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हमी दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.
 
 
 
fgtr
 
 
नागपूर औदयोगिक Sindit Airport वसाहतीसाठी सिंदी पोर्ट येथे जमीन प्रस्थावीत आहे. या ठिकाणी विमानतळ, समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने केंद्रीय पथकाकडून जागेची पाहणी करून हा प्रकल्प तातडीने सुरू करावा अशी मागणीही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारकडे प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्रातील प्रस्तावांमध्ये लक्ष घालून ते मजूर करण्यात येतील अशी हमी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सिंदी रेल्वे येथे द्रायपोर्ट पोर्टची निर्मित करण्यात आली. नागपूरपासून केवळ 65 किमी अंतर असलेल्या वर्धा जिल्ह्याचा यानिमित्ताने विकास होईल. सेवाग्राम आणि पवनार येथे देश विदेशातील पर्यटक येतात. विदेशी पर्यटकांना वर्धेत येण्यासाठी सोयीचे होईल.
Powered By Sangraha 9.0