पुसद येथे श्री कन्यका परमेश्वरी वासवी माता जयंती उत्साहात

    दिनांक :04-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
30 एप्रिल 2023 रोजी (Vasavi Mata Jayanti) आर्य वैश्य समाजाची कुलदैवत श्री कन्यका परमेश्वरी वासवी माता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात आर्य वैश्य वासवी योगा भवनामध्ये वासवी मातेच्या कुमकुम पूजनाने करण्यात आली. सीमा व अजय पापीनवार, गायत्री व गिरीश डुबेवार, स्वाती व डॉ. सुधीर पापीनवार यांनी सपत्नीक मंत्रोच्चारात वासवी मातेचे पूजन केले. त्यानंतर 108 गोत्रांच्या उच्चारांमध्ये उपस्थितांनी कुमकुम पूजन केले.
 
Vasavi Mata Jayanti
 
आर्य वैश्य वासवी भवन (Vasavi Mata Jayanti) उभारण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते नगर परिषद पुसदचे अभियंता गिरीश डुबेवार यांचा सत्कार करण्यात आला. वासवीरत्न पुरस्कार प्राप्त ज्योती अमित बोजेवार यांचाही सत्कार करण्यात आला. कन्यका परमेश्वरी वासवी माता चौक येथे जयंतीचे औचित्य साधून नव्याने निर्मित चौकामध्ये वासवी मातेचे पूजन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. उमाकांत पापिनवार, कार्याध्यक्ष सूरज डुबेवार, स्वागत अध्यक्ष दीपक आसेगावकर, सचिव मनिष अनंतवार, कोषाध्यक्ष प्रवीर व्यवहारे यांच्या हस्ते चौकाच्या नामकरण पाटिचे पूजन करण्यात आले. सोबतच समाज उपयोगी अनेक शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.
 
 
वासवी जयंतीचे (Vasavi Mata Jayanti) औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ माजी अध्यक्ष विनोद जिल्हेवार, अभय गडम, तसेच प्रा. संजय वटटमवार, अनिल तगलपिल्लेवार, प्रवीर व्यवहारे, अनिल डुबेवार यांची हेल्पलाइन या संघटनेत निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक‘मासाठी सर्व कार्यकारणी सदस्य, आर्य वैश्य समाज महिला मंडळ आणि युवा जल्लोषच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.