मानोरा,
तालुयातील शेतकरी बँकचे पिककर्ज crop loan घेण्यासाठी ३१ मार्च अगोदर नियमीत पीक कर्जाची परतफेड करतात. अशा शेतकर्यांना बँक नवीन पीक कर्ज वाटप करते. मात्र, एटीएम मशीनमध्ये पैसै नसल्याने बँकेतुन पैसे काढण्यासाठी शेतकर्यांची एकच गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकरी सेवा सहकारी crop loan सोसायटी मार्फत दरवर्षी पीक कर्जाची परतफेड करून पुन्हा बँकेतून उचल करीत असतो, त्यामध्ये बी-बीयाणे, रासायणीक खते विकत घेवुन शेताच्या मशागतीसाठी व पेरणीसाठी नियोजन करीत असतो. बँका शेतकर्याना १५ एप्रील पासुन पीक कर्जाचे वाटप करीत असते. मात्र, अवकाळी पाऊसामुळे शेतकरी बँकेत पैसै काढण्यासाठी येऊ शकला नाही त्यात एटीएम पैसै काढता येऊ शकले असते. मात्र, एटीएम मशीन मध्ये ठणठणाट असल्यामुळे मानोरा येथील जिल्हा मध्यवती बँकत पैसै काढण्यासाठी शेतकर्याची एकच गर्दी दिसून येत आहे. यामुळे बँकेचे धोरण कुचकामी ठरत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.