बुलढाणा,
1999 साली बोदवड उपसा सिंचन योजना (Bodwad Irrigation Scheme) मंजुरात मिळाली. मात्र हे काम थंड बस्त्यात पडले होते. तापी खोरे विकास महामंडळ पंतप्रधान कृषी संजवनी योजनेत आता राज्य व केंद्र दोघांचे प्रत्येकी 50 टक्के रक्कम मिळून कायम टंचाईग्रस्त मोताळा तालुक्यातील 112 गावांना लाभ मिळणार आहे. नळगंगा धरण येथून दहा गावांसाठी सिंचनाला देखील मंजुरात मिळाली आहे. कृषी महाविद्यालय बुलढाणा येथील पंजाबराव कृषी महाविद्यालयाच्या मंजूर जागेत उभारला जाणार आहे. त्यामुळे सहाशे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच बोथा अभयारण्यात अकरा किलोमीटरचा उडाणपूल शहरात सहापदरी रस्त्याला मंजूरी प्राप्त झाली असल्याची माहिती आ. संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे आज दि. रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष धनंजय बारोटे, गजानन दांदडे, विजय जायभाये उपस्थित होते. आ. संजय गायकवाड यांनी विकास कामांची माहिती देतांना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील महत्वाच्या प्रश्नांव निर्णय घेण्यासाठी कृषी वित्त तापी पाटबंधारे, विदर्भ पाटबंधारे, सचिव जलसधारण, सचिव जलसंपदा, सचिव रस्तेविकास यासह इतर विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध कामांना मंजूरात दिली आहे.
बुलढाणा शहरात कृषी संशोधन केंद्राच्या शासकीय जागेत कृषी महाविद्यालय स्थापन करणे जिल्हा मुख्यालयी कृषी महाविद्यालय या विकास कामाला शासनाकडून मंजुरात मिळाली आहे. जिल्हा मुख्यालयी कृषी विभागाची 150 एकर जमीन उपलब्ध आहे. याच ठिकाणी महाविद्यालयास मुख्यमंत्र्यांनी मंजूरत दिली आहे. बोदवड उपसा सिंचन योजनेत मोताळा तालुक्यातील 120 दुष्काळ ग्रस्त गावांचा समावेश ओद्योगिक विकास बुलढाणा येथे 500 एकर जागा, मोताळा 250 एकर जमीन अधिग्रहणास मंजुरात,शहरातील रिंग रोड, गिरडा येथे सिंचनासाठी धरण, बोथा अभयारण्यामध्ये 11 किमीचा उडाणपूल ला देखील मंजुरात मिळाली आहे. राजुर घाटामध्ये होणारे अपघात पाहता या ठिकाणाहून वनवे ट्रॅफिक सुरू करावे अशी मागणी पुढे येत होती. जुना खडकी रोड प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. एडेड हायस्कूल ते सहकार विद्या मंदिर पर्यंतचा 6 पदरी रस्ता यासह इतर विकास कामांना मंजुरात देण्यात आल्याची माहिती आ. गायकवाड यांनी दिली आहे.