देवा रे देवा, विमानात विंचू चावला...!

    दिनांक :06-May-2023
Total Views |
- नागपूर-मुंबई प्रवासातील प्रकार
 

नवी दिल्ली, 
Air India एअर इंडियाच्या विमानात अलिकडे नेहमीच काही ना काही घटना घडत असतात; ज्यामुळे एअर इंडियाच्या सेवेविषयी वारंवार प्रश्नचिन्ह उद्भवत आहेत. एअर इंडियाच्या विमानात आता एक दुर्मिळ घटना घडली आहे. या कंपनीच्या विमानात एका महिला प्रवाशाला मागील महिन्यात विंचू चावला आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागपूर ते मुंबई विमानात हा प्रकार घडला आहे.
 
 
Air India
 
विमानतळावर उतरताच डॉक्टरांनी या प्रवाशावर उपचार करीत रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती विमान कंपनीने निवेदनात दिली. Air India एअर इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, 23 एप्रिल रोजी आमच्या फ्लाईट एआय 630 मध्ये एका प्रवाशाला विंचवाने डंख मारल्याची अत्यंत दुर्मिळ आणि दुर्दैवी घटना घडली होती. विमानतळावर विमान उतरताच या महिला प्रवाशावर तातडीने प्रथमापचार करण्यात आले आणि नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, एअर इंडियाच्या अभियांत्रिकी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. आमच्या पथकाने सर्वच दिशादर्शक सूचनांचे पालक करीत, विमानाची संपूर्ण तपासणी केली असता विंचू सापडला. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगिर आहोत, असे प्रवक्त्याने सांगितले.