माता वासवी कन्यका परमेश्वरी जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

06 May 2023 16:38:27
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
आर्य वैश्य समाजातर्फे माता वासवी कन्यका परमेश्वरी (Parameshwari Jayanti) आराध्य कुलस्वामिनी जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. येथील आर्य वैश्य भवन येथून सकाळी ही शोभायात्रा निघाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत भवनात समारोप करण्यात आला.
 
Parameshwari Jayanti
 
तत्पूर्वी माता वासवी कन्याका परमेश्वरीची (Parameshwari Jayanti) विधिवत पूजा आरती करून महाप्रसादाने सांगता झाली. यावेळी विभागाचे आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजू जयस्वाल, अ‍ॅड. संतोष जैन उपस्थित होते. या शोभायात्रेत आर्य वैश्य समाजातील पुरुष, महीला, मुले, मुली मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. या शोभायात्रेसाठी आर्य वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्ष अर्चना कोकडवार, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगिरवार, युवक अध्यक्ष व्यंकटेश निलावार, किरण मुक्कावार यांनी प्रयत्न केले. यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
Powered By Sangraha 9.0