इंफाळ,
मणिपूरमधल्या हिंसाचारानंतर शनिवारी राज्यातील जनजीवन सामान्य पाहायला मिळाले. Manipur violence लोकांना औषध आणि अन्न यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी तीन तासांसाठी कर्फ्यू शिथिल केला जाणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आलेला कर्फ्यू सकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत शिथिल केला जाईल. शनिवारीही दुपारी ३ ते ५ या वेळेत दोन तासांची विश्रांती देण्यात आली होती. सर्व प्रमुख भागात आणि रस्त्यांवर लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी ज्या भागात अतिरेकी गट आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली त्या भागांना बॅरिकेड्स लावून घेरण्यात आले आहे.
मणिपूरमधील Manipur violence वांशिक हिंसाचारात मृतांची संख्या 54 वर पोहोचली आहे, तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, मणिपूरमधील 1,100 हून अधिक लोक आसामच्या कछार जिल्ह्यात पोहोचले आहेत. त्याच वेळी, विद्यार्थ्यांसह सुमारे 500 लोक इंफाळ विमानतळावर दिसले, जे राज्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ईशान्येकडील राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आणि वांशिक समुदायांमध्ये संवाद साधण्याचे आवाहन केले. बुधवारी कुकी आणि नागासह आदिवासींनी मेईतेई समाजाच्या एसटी दर्जाच्या मागणीविरोधात निदर्शने केली, त्यानंतर दंगल उसळली.
मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, 7 मे रोजी होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG पुढे ढकलण्यात आली आहे. एनटीएने शनिवारी सांगितले की ज्या उमेदवारांचे परीक्षा केंद्र मणिपूरमध्ये आहे त्यांच्यासाठी लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल.