हैदराबाद,
सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे हा चित्रपट जिथे अनेकांच्या पसंतीस उतरला आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाला ट्रोलही केले जात आहे. सुमारे 40 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत सुमारे 20.53 कोटींची कमाई केली आहे. एकीकडे चित्रपटाचे कलेक्शन चांगले असताना दुसरीकडे या चित्रपटाने IMDb वर धमाका केला आहे आणि 2023 चा सर्वाधिक रेट केलेला बॉलिवूड चित्रपट बनला आहे.
"The Kerala Story" चे रे'टिंग
अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाला IMDb वर 8.3 रेटिंग मिळाले आहे. 19 हजार मतांवर आधारित, The Kerala Story चे सरासरी रेटिंग 8.3 आहे. 81.5% वापरकर्त्यांनी चित्रपटाला 10 रेटिंग दिले आहे, 7.6% वापरकर्त्यांनी 9 रेटिंग दिले आहे, 0.9% वापरकर्त्यांनी 8 रेटिंग दिले आहे आणि 9.2% वापरकर्त्यांनी चित्रपटाला 1 रेटिंग दिले आहे.
'द केरळ स्टोरी'च्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी मोठी झेप
द केरळ स्टोरीने 2023 मधील (The Kerala Story) सर्वोच्च IMDb रेटिंग मिळवले आहे, तर दुसरीकडे भारतातील सर्वाधिक कमाई करणारा शाहरुख खानचा चित्रपट पठाण या रेटिंगमध्ये मागे पडला आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचे रेटिंगही घसरले आहे.