आयआयटी कानपूरने बनविले कृत्रिम हृदय

08 May 2023 22:00:43
कानपूर, 
आयआयटी कानपूरने (Artificial heart) हृदयंत्र नावाचे कृत्रिम हृदय बनविले असून, त्याचे प्रात्यक्षिक प्राण्यांवर करण्यात येत आहे. हैदराबादेतील एका कंपनीत सुद्धा त्याची यशस्वीता तपासण्यात येत असल्याचे सूत्राने सांगितले. हृदयंत्र प्रकल्पाचे प्रमुख संशोधक अमिताभ बंदोपाध्याय यांनी सांगितले की, हृदयंत्रमधील यंत्रणांची तपासणी करत चाचणी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. गरज भासल्यास काही उपकरणांमध्ये बदल करण्यात येईल. पुढील दिवसांत गायीच्या वासरावरील परीक्षणासाठी भारताबाहेर सुद्धा जावे लागू शकते.
 
Artificial heart
 
दरम्यान, आयआयटी कानपूरच्या (Artificial heart) हृदयाला सर्वांत स्वस्त आणि अत्याधुनिक कृत्रिम हृदय असल्याचे समजण्यात येत असून, सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास 2025-26 पर्यंत ते प्रत्यारोपणासाठी तयार असेल. मात्र, त्याची जास्तीत किमत 10 लाख रुपये असेल.
Powered By Sangraha 9.0