जम्मू,
Amarnath ShivLing : काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये अंगाची लाही लाही करणार्या तापमानामुळे वातावरणातील उष्मा वाढला होता. तापमानाने 132 वर्षांतील विक्रम मोडला होता. त्यातच आता समुद्रसपाटीपासून 14 हजार फुटांवर स्थित (Amarnath ShivLing) अमरनाथ गुहेतील शिवलिंग संपूर्ण अवतारात प्रकटले आहे.
अमरनाथ यात्रेपूर्वीच (Amarnath ShivLing) भाविकांनी शिवलिगांचे दर्शन घेऊ नये, यासाठी सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाने शिवलिंगाचे छायाचित्र जारी केले असून, यात शिवलिंग संपूर्ण आकारात प्रकटले असल्याचे दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे जगभरातील हिमनग वितळत असताना दुसरीकडे शिवलिंग 20 ते 22 फूट आकारात प्रकटले आहे, हे विशेष! अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार असून, 1 जुलै रोजी भाविक शिवलिंगाचे दर्शन घेतील. वाढत्या तापमानामुळे शिवलिंगाची आकार कमी होणार असल्याचा दावा केला असताना, 14 हजार 500 फूट उंचीवर असलेल्या शिवलिंगाने हा दावा खोटा ठरविला आहे.
गुहेच्या संरक्षणासाठी पोलिसांचे पथक पोहोचले आहे. काही पोलिसांनी (Amarnath ShivLing) शिवलिंगाचे छायाचित्र काढले आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा शिवलिंगाच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले होते, ते योग्यच असल्याचे सांगितले जात आहे.