अमोल सांगानी
राळेगाव,
तालुक्यातील वडकी येथून (Nagpur-Hyderabad highway) राष्ट्रीय महामार्ग क‘मांक 44 गेला आहे. हा रस्ता चारपदरी असल्याकारणाने वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावल्या गेले आहे. त्यामुळे दोन्हीकडून या महामार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते.
वडकी गावापासून देवधरीपर्यंत तर वडकी ते कारेगावपर्यंत वाहतूकदारांच्या सोयीसाठी या राष्ट्रीय महामार्ग लगत पेट्रोलपंप बार, धाबे थाटल्या गेले आहेत. मात्र या महामार्गालगतच्या काही व्यवसायींनी नियमांना तिलांजली देत आपल्या सोयीसाठी या राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला फोडून रस्ते तयार केले आहेत. अर्ध्यातच दुभाजक फोडून मोठमोठे रस्ते तयार केले आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची सं‘या वाढली आहे. आपल्या सोयीसाठी काही व्यवसायींनी दुभाजक फोडून मधातून रस्ते तयार करून अपघाताला आमंत्रण दिल्याचे चित्र वडकी नॅशनल हायवे क‘मांक 44 (Nagpur-Hyderabad highway) वर पहायला मिळत आहे. वडकी ते देवधरी पर्यंत 4 ते 5 ठिकाणी हे दुभाजक फोडून रस्ते तयार केल्या गेले आहेत.
याच दुभाजक फोडून असलेल्या रस्त्यावर 1 मे रोजी दहेगाव येथील नयनलाल काळे यांचा हायवे रोडवरील मंगी फाट्याजवळ मोटरसायकलने रस्ता ओलांडताना अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. एवढी मोठी घटना घडूनही संबंधित रस्ते विभाग यंत्रणेला जाग आला नाही. वडकी ते देवधरीपर्यंत अनेक ठिकाणी दुभाजक फोडून मोठ्या प्रमाणात रस्ते तयार केले गेले आहेत, ही बाब संबंधित यंत्रणेला माहीत असूनसुद्धा याला पाठीशी घालण्यात येत आहे. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची सं‘या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे संबंधित जिल्हाधिकार्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून हा गंभीर प्रकार थांबवावा, अशी मागणी वडकी येथील सूज्ञ नागरिक करीत आहे.
या राष्ट्रीय महामार्ग क‘मांक 44 (Nagpur-Hyderabad highway) वर वडकी ते करंजी दरम्यान काही प्रमाणात मोठे खड्डे तयार झाले आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर तीन महिन्यांत जवळपास 10 जणांना प्राण गमवावे लागलेले आहे. रस्त्याच्या विकासासाठी केले जाणारे नियोजनच कोलमडल्याने अपघाताच्या सं‘येत वाढ झालेली आहे. असे विदारक चित्र असतानाही महामार्ग प्राधिकरणतर्फे रस्ते सुरक्षेबाबत नियोजन करण्यात आलेले नाही असे दिसते.
नागपूर ते हैद्राबाद लाइफलाईन असलेला रोड मृत्यूचा सापळा हे बिरुद लागण्यास नागरिकही जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. वडकी गावाजवळ असलेल्या या रोडवरील दुभाजक जागोजाग फोडल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. शिवाय जड वाहनांची बेसुमार वाहतूक आणि त्यामुळे रस्त्यांचे कमी होणारे आयुष्य हेही अपघातांना कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यावरील खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होतात. तसेच क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणारी जड वाहने गावातून जात असल्याने खड्ड्यांच्या सं‘येत वाढ झालेली आहे.