मुंबई,
Vishwanath Mahadeshwar मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे रात्री 2 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाडेश्वर यांनी 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी दोन वाजता ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी चार वाजता त्यांची अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी इथल्या स्मशानभूमीच्या दिशेने निघेल.
विश्वनाथ महाडेश्वर यांनी २०१७ ते १०१९ या काळात मुंबईचे Vishwanath Mahadeshwar महापौरपद भूषवले होते. त्यांनी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, ते स्थायी समितीचे सदस्य देखील होते. दरम्यान, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदार संघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.