बांधाचे काम न झाल्यास शेती चिबडत असल्याचा शेतकर्याचा आरोप
दिनांक :01-Jun-2023
Total Views |
मानोरा,
Agricultural तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत तालुयातील पात्र शेतकर्यांच्या शेतशिवारातील ढाळीच्या बांधाचे व पाणलोट संबंधी कामे पैशाची मागणी पूर्ण न केल्यामुळे काम अडवून ठेवणार्या सबंधित कर्मचार्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी निवेदन तहसीलदार मानोरा यांना कारखेडा येथील शेतकर्याने दिले आहे.
देविदास थावरा राठोड हेAgricultural कारखेडा या गावचे निवासी असून, त्यांची शेती विठोली शेत शिवारातील गट नंबर १.१२ मध्ये १.३९ हे. आर. शेती असून सध्या शासनाकडून या शिवारात पाणलोट विकासाअंतर्गत शेतीच्या ढाळीची बांधांची कामे करून देण्यात येत आहेत. तक्रार करता शेतकर्याच्या आजूबाजूच्या शेतीची पाणलोटची कामे संबंधित विभागाच्या अधिकार्याने करून दिली असून, राठोड यांना कृषी विभागाकडून फोन करून ढाळीच्या कामासाठी शेतशिवारात हजर राहायला लावून पाणलोटाची कामे करून दिलेली नाहीत. संबंधित कर्मचारी व कृषी अधिकार्यांना वारंवार फोन करूनही पुढची तारीख देऊन शेतकर्याला ताटकळत ठेवल्या जात असल्याची आपबीती शेतकर्यांनी तक्रारी द्वारे मांडली आहे. पाणलोटाची शेतशिवाराची कामे करून घ्यावयाची असल्यास त्याचे दाम (लाच) द्यावी लागेल असे अप्रत्यक्ष संबंधित विभागाकडून निरोप दिल्या गेल्याचे शेतकर्याने तक्रारीत नमूद केले आहे. शेतकर्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे व शेत शिवारात पाणी साचत असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी ढाळीच्या बांधाचे काम पूर्ण करून देण्यात येण्याची मागणीही निवेदना द्वारे केली आहे.