पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी नॅनो तंत्रज्ञानाची निर्मिती- उदय तिजारे

नॅनो खत प्रशिक्षण कार्यक्रम

    दिनांक :01-Jun-2023
Total Views |
वाशीम, 
nanotechnology पिकांना अन्न घटकांचा पुरवठा हा फवारणीच्या माध्यमातून नॅनो तंत्रज्ञानाने करायचा आहे. जेणेकरुन जमीन, पाणी व हवा खराब न होता पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी नॅनो तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली. असे प्रतिपादन इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे यांनी केले.
 
 
GYTTY
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील nanotechnology नियोजन भवन येथे इफको आणि कृषी विभाग यांच्या संयुक्तवतीने नॅनो खत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून तिजारे बोलत होते. मंचावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गणेश गिरी, कृषी व्यावसायीक संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटील व इफकोचे क्षेत्रिय अधिकारी सागर मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती
तिजारे म्हणाले, नॅनो तंत्रज्ञानविषयक कार्यशाळा राज्यात सर्वप्रथम वाशीम येथे होत आहे. गेल्या तीन चार वर्षापासून नॅनो तंत्रज्ञानाविषयी चर्चा व्हायला सुरुवात झाली. हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत सन २०२१ ला पोहचले. १९७० च्या दशकात देशात पहिली हरितक्रांती झाली. त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. परदेशातून अन्नधान्य मागवावे लागत होते. शासन, कृषी शास्त्रज्ञ व संशोधकांच्या अथक परिश्रमातून संकरीत वाण तयार करण्यात आले. हरितक्रांतीला पाठबळ देण्यासाठी इफको ही सहकारी संस्था पुढे आली. सरकारने प्रयत्न करुन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांच्या शेतात रात्रीला युरीया फेकला. जेंव्हा शेतकर्‍यांना कळले की, युरीया दिल्यामुळे उत्पन्न वाढते त्यावर शेतकर्‍यांचा विश्वास बसला. कालांतराने शेतकर्‍यांचा युरीयावर एवढा विश्वास बसला की, त्याचा अवास्तव गरजेपेक्षा जास्त वापर सुरु झाला. फक्त युरीयाच नव्हे तर इतरही खतांचा देखील जास्त वापर सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी nanotechnology  तोटावार मार्गदर्शन करतांना म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी आता भविष्यात नॅनो युरीयाचा वापर करतील. त्यामुळे जमीनीच पोत कायम राहून पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. नॅनो युरीयाच्या वापराबाबत शेतकर्‍यांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्याचे सभासद, कृषी निविष्ठा विक्रेते, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी तिजारे यांनी उपस्थित शेतकर्‍यांनी नॅनो युरीयाच्या वापराबाबत विचारलेल्या शंकांचे निराकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माच्या प्रकल्प संचालक महाबळे यांनी केले. संचालन स्मार्ट प्रकल्पाचे संतोष वाळके यांनी केले. उपस्थितांचे आभार सुनिल पाटील यांनी मानले.