मैलाराम येथील शेतकर्‍यांना बीज प्रक्रियेचे धडे

    दिनांक :01-Jun-2023
Total Views |
आलापल्ली, 
seed processing अहेरी तालुक्यातील वेलगुर परिसररातील मैलाराम गावातील शेतकर्‍यांना प्रत्यक्षात बीज प्रक्रियेचे धडे देऊन शेतकर्‍यांना येथील कृषी सहायक रोशनी मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. एखाद्या पिकापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्याची आवश्यकता असते. पेरणी करण्यापुर्वी बीजप्रक्रिया केली जाते. त्यामुळे बियाण्यातून प्रसारित होणार्‍या रोगांना अटकाव घालता येतो. म्हणूनच पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना मेश्राम यांनी दिला.
 
युति
 
 
ज्वारी, भात आणि बाजरी seed processing या पिकाच्या बियाण्यावर मिठाच्या पाण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे अरगट, काणी, करपा यारख्या रोगावर नियंत्रण मिळवता येते. बीज प्रक्रियेसाठी 3 किलो मीठ 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात बी ओतावे व ढवळावे. द्रावणावर तंरगणारे हलके बी बाहेर काढून जाळावे व तळाशी असलेले जड बियाणे बाहेर काढून 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे आणि त्यानंतरच बुरशीनाशखाची बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे भातावरिल कडा करपा, करपा रोगाचे नियंत्रण होते, अशी माहिती कृषी सहायक रोशनी मेश्राम यांनी दिली. यावेळी वेलगुर व मैलाराम गावातील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.