जम्बुदीप नगरातील नाल्याच्या स्वच्छतेची नागरिकांची मागणी! व्हिडीओ...

10 Jun 2023 16:33:59
नागपूर,
drain cleaning दक्षिण नागपुरातील जम्बूदीप नगर हा नाला अयोध्या नगर, जम्बुदीप नगर, महालक्ष्मी नगरातून निघालेला आहे. या नाल्याच्या पाण्यामध्ये डास, कृमी कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. नाल्यात शेवाळ जमा झाल्याने पाणी अडून दुर्गंधी पसरते. लोकांनी प्लॅस्टिक बाटल्या, काडी कचरा फेकून नाल्यात घाण करून ठेवली आहे.
 
rt
 
नाल्यातील पाण्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.  drain cleaning काही ठिकाणी सांडपाण्याचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. यापासून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते म्हणून जम्बूदीप नाल्याची स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी. मान्सून पूर्वी हे काम व्हावे, अशी नागरिकांची मागणी असल्याची माहिती समाजसेवक अजय राऊत यांनी दिली.
 
 
 
 

सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0