तभा वृत्तसेवा
वर्धा,
Savitribai Phule Award : वर्धा सोशल फोरम गेल्या आठ वर्षांपासून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय वर्धा यांच्या विशेष सहकार्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मोफत बी- बियाणे वाटप कार्यक्रम घेत असतो. सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मोफत बी वाटप मान्सून भेट कार्यक्रम रविवार 11 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित केला आहे.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिल राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, विनायक महामुनी, डॉ. सुनीता महात्मे आणि जिल्हा कृषी अधीक्षक प्रभाकर शिवणकर यांची उपस्थिती राहणार आहे. वर्धा जिल्ह्यातील जवळपास शंभर पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना किमान दोन एकरकरिता मोफत बी -बियाणे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आशा निंबोळकर, वैशाली पाटील, भारती पाटील, डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ.अभ्युदय मेघे, सचिव अविनाश सातव, श्याम परसोडकर, रवींद्र टप्पे, श्रीकांत राठी, राहुल अवथनकर, चंद्रशेखर राठी, दिलीप कठाने, प्रफुल्ल गुल्हाने, हरिष जोतवानी यांनी केले आहे. (Savitribai Phule Award)