धनादेश अनादरप्रकरणी दंडासह एक वर्ष कारावास

    दिनांक :11-Jun-2023
Total Views |
आकोट,
dishonor of cheque धनादेश अनादरप्रकरणी आरोपी शिवलाल गंगाराम बेठे याला दंडासह एक वर्ष कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. तालुक्यातील बोर्डी येथील राय कृषी सेवा केंद्र यांनी राहनापूर येथील आरोपी शिवलाल गंगाराम बेठे यांच्या विरूध्द प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धनादेश अनादर प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणी परक्राम्य अभिलेख अधिनियमा मध्ये प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. एम. रेडकर यांनी 3 जून रोजी आरोपी शिवलाल गंगाराम बेेठेला धनादेश अनादर प्रकरणी दंडासह एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. संतोष शंकरलाल राय यांचे बोर्डी येथे राय कृषी सेवा केंद्र या नावाचे दुकान आहे.या दुकानातून आरोपीने 2018 मध्ये वारंवार बी-बियाणे, खते, औषधी उधारीवर नेले व त्याच्याकडे असलेले रकमेचा धनादेश आरोपीने फिर्यादीला दिला. हा धनादेश फिर्यादीने वटविण्यासाठी बँकेत लावला असता तो न वटविता परत आल्यामुळे फिर्यादीने न्यायालयात प्रकरण दाखल केले.
 
 
cheksj
 
या प्रकरणात फिर्यादीने पुरावे व कागदपत्रे दाखल केले. तसेच आरोपीने सुध्दा स्वतःचा पुरावा देवून इतर पुरावे तपासले. यातील संपूर्ण विवेचनावरून न्यायालयाने उपरोक् त निर्णय दिला आहे. dishonor of cheque फिर्यादीतर्फे विधिज्ञ नीलेश आर. राठी यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी शिवलाल गंगाराम बेठे याला एका वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा व धनादेश रक्कम रू.1,05,000 याच्या दुप्पट रक्कम रू. 2,10,000 व धनादेश तारखेपासून म्हणजेच 15 मार्च 2018 पासून आजपावेतो 9 टकके दराने व्याज सुध्दा देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम आरोपीने दिली नाही तर सहा महिन्याची अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा देण्याचे आदेश सुध्दा न्यायाधीशांनी दिले आहेत.