प्रथमेश इंगळे भारतीय सेनेत लेप्टनंटपदी विराजमान

12 Jun 2023 18:34:35
गडचिरोली, 
Prathamesh Ingle शहरातील स्कूल ऑफ स्कालर्समध्ये सन 2016-17 या सत्रात दहावीचे शिक्षण घेतलेला प्रथमेश इंगळे याची नुकतीच भारतीय सेनेमध्ये लेप्टनंटपदी निवड झाली आहे. प्रथमेशच्या या यशामुळे गडचिरोलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. प्रथमेशने उच्च माध्यमिक शिक्षण एस. पी. आय. औरंगाबाद येथे घेतले.
 
 
tfg
 
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.) तर्फे घेण्यात आलेल्या Prathamesh Ingle परीक्षेमध्ये त्याची ऑल इंडिया रँक 19 होती. पहिले तीन वर्ष खडकवासला येथे प्रशिक्षण घेऊन शेवटचे वर्ष इंडियन मिलीटरी अकादमी देहरादून येथे पूर्ण केले. प्रथमेशने सामान्य आणि संघर्षमय परिस्थितीमध्ये अतिशय प्रमाणिकपणे आणि सुनियोजित अभ्यास करून हे यश गाठले आहे. आता तो भारतीय सेनेमध्ये लेप्टनंट या पदावर देशसेवेसाठी विराजमान झालेला आहे. एवढ्या कमी वयात खडतर असे प्रशिक्षण घेऊन लप्टनंटदी निवड झाल्याने स्कुल ऑफ स्कॉलर्स तसेच गडचिरोली जिल्ह्याचे नाव रोशन झाले आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरावर कौतूक होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0