शिवकालीन युद्धकला स्पर्धेत २७ विद्यार्थ्यांना विविध पदके

ShivShakti Akhada मुलांना बौद्धिक आणि सामाजिक ज्ञान

    दिनांक :12-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
ShivShakti Akhada शिवशक्ती आखाडा आणि क्रीडा भारती महानगरतर्फे रविवार, ११ जूनला शिवकालीन युद्धकलेची स्पर्धा ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात घेण्यात आली. ShivShakti Akhada यात १५० विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर करून ९ गोल्ड, ९ सिल्व्हर आणि ९ ब्रॉन्झ पदके पटकावली. यात प्रामुख्याने लाठी-काठी, भाला, तलवार, दांडपट्टाचे प्रात्यक्षिक समाविष्ट होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. ShivShakti Akhada
 
 

maratha army 
 
 
शिवशक्ती भारतीय प्राचिन भारतीय युद्धकला प्रशिक्षण केंद्रामार्फत 'शिवराय घराघरात' या मोहीमे अंतर्गत नागपुरात वेगवेगळ्या भागात भारतीय प्राचिन युद्धकलेच्या उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ShivShakti Akhada या उन्हाळी शिबिरात मुलांना लाठी-काठी, तलवार, भाला अशी विविध शस्त्रे चालविण्यास शिकवले गेले. एका माणसाला योद्धा बणण्यासाठी १६ गुणांमध्ये पारंगत व्हावे लागते. त्यातलेच काही म्हणजे युद्धकलेत पारंगत, शिस्तबद्धता, बौद्धिक, सर्वांगीण विकास, साहस, वीरता, संघर्षशिलता, धैर्य आणि जिद्द या सारखे गुण मुलांमध्ये रुजविण्याचे ध्येय शिवशक्ती आखाड्याचे आहे.  ShivShakti Akhada छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजेच शिवकालीन युद्धकला होय. ही कला दिवसेंदिवस लुप्त होत आहे. ती जोपासणे हा शिवशक्ती शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राचा उद्देश आहे.
 
 
शिवकालीन युद्धकले सोबतच मुलांना बौद्धिक आणि सामाजिक ज्ञान तसेच सेवा सुरक्षा आणि संस्कार या गोष्टींचे महत्त्व देखील पटवून दिले जाते. ShivShakti Akhada यावेळी शिवशक्ती आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष हितेश डफ, आमदार मोहन मते, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री प्रसन्न हरदास, नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयुष आंबुलकर, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शारदा नायडू, नागपूरकर युवराज श्रीमंत जयसिंग राजे भोसले, मोहता सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संभाजी भोसले, लोकजागृती मोर्चाचे संयोजक रमण सेनाड, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग नागपूर विद्यापीठाचे संचालक शरद सूर्यवंशी हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिवशक्ती परिवाराने अथक प्रयास केले. ShivShakti Akhada
 
सौजन्य : अतुल गुरू, संपर्क मित्र