महालक्ष्मी नगरात पिण्याच्या पाण्यात निघाले जळू

12 Jun 2023 20:31:38
नागपूर,
 
South Nagpur दक्षिण नागपुरातील मानेवाडा रिंग रोडवरील महालक्ष्मी नगरात अनेकांच्या घरी पिण्याच्या पाण्याच्या नळात जळू निघाले. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. South Nagpur लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. महालक्ष्मी नगरातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या परंतु त्याकडे मनपा व माजी नगरसेवक दुर्लक्ष करीत आहे. South Nagpur गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी महालक्ष्मी नगरात अनेकांच्या घरी नळाच्या पाण्यातून जळू व किडे निघाले, अशी माहिती सुनील आखरे यांनी दिली.
 
 

South Nagpur 
 
 
 
पंधरा दिवसांपासून आजपर्यंत रिंग रोड, संजय गांधी नगर, वार्ड क्र. १ येथे रोज किडे व अळ्या नळाच्या पाण्यात आढळत आहेत. इतरही अनेक भागांमध्ये अळ्या व जळू आढळले आहेत. South Nagpur संजय गांधी नगर येथील अरविंद घोरमारे यांनी जलप्रदाय अधिकांऱ्याना ५ जून रोजी निवेदन दिले. परंतु अद्यापही कारवाई झाली नसल्याची माहिती महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना नागपूर शहराचे अध्यक्ष सिद्धू कोमजवार यांनी दिली. South Nagpur
 
पिण्याच्या पाण्यामध्ये जळू व अळ्या आढळण्याची प्रकरणे वाढत असून, अनेकांच्या घरी नळाला गढूळ पाणीदेखील येत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. South Nagpur दक्षिण नागपुरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या परंतु यावर प्रशासानाने कोणतीही कठोर कारवाई केली नाही. प्रशासनाने विकास कामे कमी करावी परंतु नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, याच्याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. South Nagpur
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0