नेदरलँडमधील विठोबांच्या दिंडीत नागपूरकरांचा सहभाग

13 Jun 2023 18:50:41
नागपूर,
 
Wari in Netherlands नागपुरातील अभ्यंकर नगर येथे राहणाऱ्या वर्षा गीद यांची मुलगी पूर्वी आणि जावई अभिजीत नाझर हे नेदरलँडमध्ये विठोबाच्या दिंडीत सहभागी झाले होते. भारतापासून हजारो मैल दूर युरोप मधील नेदरलँडमध्ये अल्मीर नावाच्या शहरात शनिवार, १० जून रोजी विठू रायाची दिंडी निघाली. Wari in Netherlands विठू नामाच्या गजरामुळे अल्मीर शहर पंढरपूराप्रमाणे भासत होते. या शहरात असलेले नागपूरमधील तरुण अतिशय उत्साहात दिंडीत चालत होते.
 
 
wari
 
पुरुषवर्ग पांढऱ्या शुभ्र कपड्यात, गळ्यात तुळशी माळ, कपाळाला चंदनाचा टिळा, हातात भगवा ध्वज घेऊन होते. स्त्रीयांनी लाल नऊवार, नथ, अंबाडा त्यावर गजरा आणि हातात टाळ, असा वेश परिधान केला होता. लहान मुलेही भारतीय वेशात होती. विठ्ठल रुखमाईच्या वेशात दोन बालके सजली होती. शिवाय मोठी पालखी ज्यात विठुरुखमाईच्या सुरेख मूर्ती सजवल्या होत्या आणि कौतुक म्हणजे ही भक्त मंडळी पालखी हातात घेऊन पायात चप्पल-बूट न घालता दिंडीच्या मधोमध चालत होती.
 
 
अशाप्रकारे ही दिंडी विठ्ठल, तुकाराम, ज्ञानोबा असा गजर करीत पुढे सरकत होती. सगळा प्रेक्षक वर्गही नामात सहभागी झाला होता. अशी शेकडो भक्तांच्या अतिशय शिस्तबद्ध आणि भक्तिरसात न्हाहून निघालेल्या दिंडीने संपूर्ण वातावरण पंढरीच अवतरल्यागत झाले होते.
 
 
सौजन्य : वर्षा देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0