ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. शरद पेंडसे यांचे निधन

14 Jun 2023 18:41:44
नागपूर, 
Dr. Sharad Pendse : ‘गोड बोलून साखर तोडणारे आणि जगणं सुसह्य करणारे’ अशी ख्याती असलेले रुग्णप्रिय, मध्य भारतातील पहिले मधुमेह तज्ज्ञ डॉ. शरद पेंडसे (Dr. Sharad Pendse) यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. संकेत, सून, कन्या व मोठा आप्त परिवार आहे.
 
Dr. Sharad Pendse
 
मोक्षधाम येथे सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडला. पेंडसे कुटुंबीयांसह वैद्यकीय जगतातील अनेक मधुमेह तज्ज्ञ, इतर डॉक्टर्स व अनेक रुग्ण यावेळी उपस्थित होते. धंतोलीतील (Dr. Sharad Pendse) डॉ. शरद पेंडसे यांचा दवाखाना माहिती नाही आणि डॉक्टरांशी परिचय नाही, असा नागपूरकर सापडणे कठीण, असा एक काळ होता. डॉ शरद पेंडसे यांचे उपचार सुरू आहेत, असं सांगणं स्टेट्स समजलं जायचं.
 
 
त्यांच्या जाण्यानं केवळ डॉक्टर्स नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक नागरिक व मधुमेहींना धक्का बसला. आपण एकमेकांना गोड खाऊ घालतो, काहीच जमलं नाही तर साखर घातलेला चहा तरी ऑफर करतो. (Dr. Sharad Pendse) डॉ. पेंडसे रुग्णाशी गोड बोलायचे, साखर तोडायचे आणि जगणं सुसह्य करायचे. ‘माणूस सोडून सगळे प्राणी फक्त चालतात. चालत रहा आणि व्याधीमुक्त व्हा. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्ताआधी जेवा आणि व्याधी संपवा. प्राणी कधीही तेलात तळलेलं आणि तुपात बुडवलेलं खात नाहीत. प्राण्यांचं अनुकरण करा. मैदा वर्ज्य करा, तन्दुरुस्त जगाल,’ असे ते नेहमी सांगत.
 
 
एकदम तरल विनोदी स्वभाव. तरी डॉक्टरांचा धाक वाटायचा, जरब असायची. त्यांच्या या जरबेचा परिणाम असा की, त्यांचा मधुमेही रुग्ण न विसरता औषधं घ्यायचा. डॉ. पेंडसे यांचा अनेक सामाजिक संघटनांसोबत संबंध होता. (Dr. Sharad Pendse) ड्रीम ट्रस्टचे संस्थापक आणि रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडियाचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांनी 1997 मध्ये स्थापन केलेला ड्रीम ट्रस्ट आता 26 वर्षांचा आहे. ट्रस्टतर्फे विदर्भातील दोन हजारावर टाईप- 1 मधुमेहींना निःशुल्क इन्सुलिन दिले जाते. परिस्थिती गरिबीची आहे अशा मुलांसाठीच ही सेवा दिली दाते.
Powered By Sangraha 9.0