तभा वृत्तसेवा
सालेकसा,
Tribal Commissioner आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात भाजपच्या पंचायत समिती सदस्या अर्चना मडावी यांनी 13 जून रोजी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे आयुक्तांना दिले. निवेदनात, प्रत्येक आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांची जागा वाढवण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा नियमित घेण्यात यावी, परदेशी शिक्षणाकरिता आदिवासी विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीच्या उत्पन्नाची अट 12 लाख इतकी करण्यात यावी, आदिवासी विद्यार्थांसाठी नोकरी विषयी रोजगार मार्गदर्शन मेळावे तालुका पातळीवर घेण्यात यावे, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे आदिवासी मुलामुलींचे स्वतंत्र वसतीगृह स्थापन करावे, आश्रमशाळेतील रिक्त असलेली शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, आश्रमशाळेतील व वसतीगृहातील मुलींना आत्मसुरक्षेचे धडे देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.