महाराष्ट्र प्रीमियर लीग : पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स एकमेकांशी भिडणार
15 Jun 2023 15:44:22
मुंबई,
Maharashtra Premier League : महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL)ला आजपासून सुरुवात होत आहे. यामध्ये एकूण सहा संघ प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. या लीगमध्ये एकूण 19 सामने खेळले जाणार असून, साखळी टप्प्यात राऊंड-रॉबिन फॉरमॅटचा अवलंब केला जाईल. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि राजवर्धन हंगरगेकर या आयपीएलमधील काही अव्वल परफॉर्मर्स या लीगमध्ये भाग घेणार आहेत. आज MPLमध्ये पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या टीमच्या खेळण्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. केदार जाधव हा कोल्हापूर संघाचे नेतृत्व करणार आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार आहे. पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, सोलापूर रॉयल्स असे सहा संघ खेळणार आहेत. पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या संघाचा सामना आज रात्री 07:30 वाजता होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.