महाराष्ट्र प्रीमियर लीग : पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स एकमेकांशी भिडणार

विदर्भातील एकही संघ नाही !

    दिनांक :15-Jun-2023
Total Views |
मुंबई, 
Maharashtra Premier League : महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL)ला आजपासून सुरुवात होत आहे. यामध्ये एकूण सहा संघ प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. या लीगमध्ये एकूण 19 सामने खेळले जाणार असून, साखळी टप्प्यात राऊंड-रॉबिन फॉरमॅटचा अवलंब केला जाईल. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि राजवर्धन हंगरगेकर या आयपीएलमधील काही अव्वल परफॉर्मर्स या लीगमध्ये भाग घेणार आहेत. आज MPLमध्ये पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या टीमच्या खेळण्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. केदार जाधव हा कोल्हापूर संघाचे नेतृत्व करणार आहे.

Maharashtra Premier League
 
विदर्भातील एकही संघ नाही !
महाराष्ट्र प्रिमीयर लिग (Maharashtra Premier League) क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असली तरी, विदर्भातील क्रिकेटप्रेमी काहीसे निराश आहेत. एकूण सहा संघांचा समावेश असलेल्या एमपीएलमध्ये विदर्भाच्या 11 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याचा संघ या स्पर्धेत नाही. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाच्या आयोजनातही विदर्भाला डावलले जात असल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, उर्वरीत महाराष्ट्राचे संघ आणि खेळाडूदेखील आपलेच आहेत. त्यामुळे एमपीएलचे सामने बघणार आणि क्रिकेटचा आनंदही घेणार. पण, विदर्भातून एक तरी संघ स्पर्धेत असता तर आणखी मजा आली असती, अशी अपेक्षा स्थानिक क्रिकेटरसिक व्यक्त करीत आहेत.
 
महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार आहे. पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, सोलापूर रॉयल्स असे सहा संघ खेळणार आहेत. पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या संघाचा सामना आज रात्री 07:30 वाजता होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.
 
 
संघांची नावे :
पुणेरी बाप्पा (पुणे)
सोलापूर रॉयल्स (सोलापूर)
कोल्हापूर टस्कर्स (कोल्हापूर)
ईगल नाशिक टायटन्स (नाशिक)
रत्नागिरी जेट्स (रत्नागिरी)
छत्रपती संभाजी राजे (संभाजीनगर)
 
 
सामन्यांची तारीख आणि वेळ
१५ जून २०२३ (07:30 PM) : पुणे विरुद्ध कोल्हापूर
१६ जून २०२३(7:30 PM) : नाशिक विरुद्ध संभाजीनगर
१७ जून २०२३(07:30 PM) : रत्नागिरी विरुद्ध सोलापूर
18 जून 2023(7:30 PM) : कोल्हापूर विरुद्ध नाशिक
१९ जून २०२३ (07:30 PM) : संभाजीनगर विरुद्ध रत्नागिरी
20 जून 2023 (07:30 PM) : सोलापूर विरुद्ध पुणे
21 जून 2023 (7:30 PM) : कोल्हापूर विरुद्ध संभाजीनगर
22 जून 2023 (07:30 PM) : नाशिक विरुद्ध रत्नागिरी
23 जून 2023 (7:30 PM) : सोलापूर विरुद्ध कोल्हापूर
24 जून 2023 (07:30 PM) : पुणे विरुद्ध नाशिक
25 जून 2023 (7:30 PM) : पुणे विरुद्ध रत्नागिरी
26 जून 2023 (07:30 PM) : संभाजीनगर विरुद्ध सोलापूर
27 जून 2023 (7:30 PM) : पात्रता 1 (पहिला वि/से 2रा)
28 जून 2023 (07:30 PM) : एलिमिनेटर (3रा वि/से 4था)
29 जून 2023 (7:30 PM) : क्वालिफायर 2 (Q1 मधील हरणारा विरुद्ध E चा विजेता)
30 जून 2023 (07:30 PM) : अंतिम (Q1 चा विजेता v/s Q2 चा विजेता)