माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये तेल्हारा पिछाडीवर

    दिनांक :15-Jun-2023
Total Views |
तेल्हारा,
Vasundhara Abhiyan माझी वसुंधरा हे अभियान 2 ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यात येत आहे.माझी वसुंधरा मिशन अभियान 3.0 मध्ये सहभागी असलेल्या एकूण 94 नगरपालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नगरपालिकांची यादी नुकतीच जाहीर झाली त्यामध्ये जिल्ह्यातून आकोट नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला असून तेल्हारा नगरपालिका शेवटच्या क्रमांकावर आहे. निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित व घनकचरा व्यवस्थापनात माजी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये 25 हजार ते 15 हजार लोकसंख्या असलेल्या एकूण एकूण 94 नगर परिषद, नगरपंचायती सहभागी झाल्या होत्या या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नगर परिषद, नगरपंचायतीची यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यामध्ये आकोट नगरपालिकेने 3490 गुणांसह राज्यात 29 व्या तर अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 
 
VAUSNDARA
 
त्यापाठोपाठ 2893 गुणांसह पातूर दुसर्‍या स्थानी असून 2516 गुणांसह बाळापूर तिसर्‍या स्थानी आहे त्यानंतर 2394 गुणांसह बार्शिटाकळी नगर परिषद चौथ्या स्थानी असून 1883 गुणांसह मूर्तिजापूर नगरपरिषद पाचव्या स्थानी आहे. माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये 1413 गुणांसह तेल्हारा नगरपालिका राज्यात एकूण 94 नगरपालिकांपैकी 74 क्रमांकावर असून अकोला जिल्ह्यामध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. Vasundhara Abhiyan शहरी भागात गोदरीमुक्त शहर करणे तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये चांगली कामगिरी करणार्‍या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदानातून तेल्हारा नगरपालिकेला तत्कालीन कामासाठी 3.0 कोटी प्रोत्साहात्मक अनुदान मंजूर झाले आहे. ही उच्चतम कामगिरी हे तत्कालीन अधिकारी व कर्मचार्‍यांचे असून त्याचे श्रेय आताचे अधिकारी घेत आहेत.