राष्ट्रीय आमदार संमेलनात नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

    दिनांक :16-Jun-2023
Total Views |
मुंबई, 
देशातील विधान परिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे सभापती Om Birla ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक नावीन्यपूर्ण प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील 75 मंत्री, आमदारांच्या कामाची माहिती, उत्कृष्ट 75 स्टार्ट अप, जगभरातील लोकशाही देशांची माहिती आणि भारतीय छात्र संसद याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली.
 
 
Om Birla
 
देशभरातून विविध मान्यवरांनी आणलेल्या माती आणि पाणी यांची पाहणी मान्यवरांनी केली. देशातील 50 आमदारांनी युथ पार्लमेंट स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उपक‘माचे ओम बिर्ला यांनी कौतुक केले. 15 जून ते 17 जून या कालावधीत आयोजित या संमेलनात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यात राज्यातील विकासकामांबद्दल चर्चा, अनुभव, कल्पना आणि विविध योजना या विषयांवर विचारमंथन होणार आहे. तसेच महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.