अर्थविशेष
- अनंत सरदेशमुख
fdi Maharashtra महाराष्ट्रातील वाढती परकीय गुंतवणूक समाधानकारक आणि राज्याच्या विकासाला नवा वेग देणारी आहे, असे म्हणावे लागेल. जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान राज्यातील परकीय गुंतवणूक देशातील प्रथम क्रमांकावर राहिली असून ती २९ टक्के इतकी दिसते. आपल्या मागे कर्नाटक २४ टक्क्यांवर आहे. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल प्लानिंग अँड पॉलिसी या केंद्र सरकारच्या विभागाने ही आकडेवारी दिली आहे. fdi Maharashtra याला अनुसरून मागील आकडेवारी तपासली तरी गेल्या २२ वर्षांमध्ये महाराष्ट्रात एकूण १० लाख ८८ हजार ५०२ कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली दिसते. हा आकडा देशातील परकीय गुंतवणुकीत अव्वल आहे, यात शंका नाही. याच काळात कर्नाटकमध्ये केली गेलेली परकीय गुंतवणूक ५ लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या आसपास म्हणजेच आपल्यापेक्षा निम्मी आहे. fdi Maharashtra केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध होणा-या आर्थिक अहवालानुसारही महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक देशात सर्वात मोठी होती. उद्धव ठाकरे यांच्या काळातही राज्यात ७८० प्रस्तावांवर सह्या करण्यात आल्या होत्या. fdi Maharashtra २०२१-२२ च्या काळात आपल्याकडे आलेली परकीय गुंतवणूक २ लाख ७७ हजार ३३५ कोटी इतकी होती. हा आकडादेखील इतर राज्यांपेक्षा जास्त होता.
fdi Maharashtra २०२०-२१ ला राज्याकडे परकीय गुंतवणुकीचे ३०० प्रस्ताव होते. या सगळ्यांमध्ये परकीय गुंतवणूक कशाकशामध्ये होते, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. या शतकामध्ये बाहेरच्या कंपन्यांनी भारतातील कंपन्या विकत घेण्याचे वा त्यांना आपल्यामध्ये सामील करून घेण्याचे वा त्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही कंपन्या नवीन सेवाक्षेत्रांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. या माध्यमातून राज्यात येणारी परकीय गुंतवणूक चांगल्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे आपल्या देशातील अनेक कंपन्या परदेशी जात आहेत. fdi Maharashtra उदाहरणार्थ, आपल्या सॉफ्टवेअर कंपन्या आता जगभर पसरल्या आहेत. त्यांचा बाहेरच्या देशांमध्ये होणारा फायदा भारतात परत येतो आणि कंपन्यांकडून इथे गुंतवला जातो. ही बाबही परकीय गुंतवणुकीखालीच येते. खेरीज कंपन्या-कंपन्यांमधील कर्जे वा बाहेरच्या कंपन्यांचे काही प्रोजेक्ट्स, जपानमधील ‘जायका'सारख्या काही कंपन्या मोठ्या प्रमाणावर तिथले प्रकल्प आपल्या राज्यामध्ये कार्यान्वित करतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवतात. fdi Maharashtra यामुळेही राज्यातील परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
उदाहरणार्थ, ‘जायका'ने पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. मेट्रोसाठीही त्यांनी बरीच मोठी रक्कम गुंतवली आहे. २०२२-२३ च्या काळात सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक सिंगापूरहून आली आहे. fdi Maharashtra एकूण देशामध्ये यात महाराष्ट्राचा हिस्सा अधिक आहे. qकबहुना सिंगापूरची सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच आहे. ही गुंतवणूक जवळपास १७ यूएस बिलियन डॉलर इतकी आहे. मॉरिशसची गुंतवणूक त्याखालोखाल असून ती ६.१३ बिलियन डॉलर्सची आहे. अमेरिकेची गुंतवणूक ६.६ बिलियनच्या आसपास असून युएईची गुंतवणूक ३.३५ बिलियन डॉलरच्या आसपास आहे. ही आकडेवारीही बोलकी आहे. खरे पाहता सिंगापूर हा अतिशय छोटा देश आहे. पण त्यांच्याकडे ब-याच परदेशी कंपन्या आल्या आहेत. ब-याच कंपन्या तिथे स्थापन झाल्या आहेत. त्या तिथून गुंतवणूक करतात. fdi Maharashtra म्हणजेच अमेरिकन, जर्मन, ब्रिटिश आदी देशांमधील कंपन्यांची ऑफिसेस सिंगापूरमध्ये असून त्यांची गुंतवणूक तिथूनच होते. सिंगापूरमधील करविषयक कायदे गुंतवणुकीतून होणा-या फायद्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी बाहेरच्या कंपन्या सिंगापूरला पैसे आणून तिथून आपल्या देशात-राज्यात आणतात. तसेच मॉरिशसमध्येही आहे. तिथेही अनेक कंपन्या स्थापन झाल्या असून त्यांचा मुख्य हेतू गुंतवणूक हाच आहे.
fdi Maharashtra कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे, कंपन्या विकत घेणे वा कंपन्यांमध्ये भागीदारी घेणे, त्यांचे शेअर्स घेणे अशा स्वरूपाचे आर्थिक व्यवहार करून ते आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ एचडीएफसीबरोबरच अनेक कंपन्यांमधील परकीय गुंतवणूकदारांचे प्रमाण बरेच जास्त आहे. बँकांमध्येही परकीय गुंतवणूकदारांचे प्रमाण बरेच मोठे आहे. ही सगळी गुंतवणूक ‘थेट परकीय गुंतवणूक' या सदरात मोडते. ही गुंतवणूक वाढण्याचे मुख्य कारण अर्थातच देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीमध्ये दडले आहे. १९९१ नंतर देशाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्याचे परिणाम दिसण्यासाठी २००० पर्यंतचा काळ यावा लागला. fdi Maharashtra त्या पुढच्या काळात मात्र थेट परकी गुंतवणूक वाढताना दिसून आली आहे. यातही वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉंड्स, शेअर्स यामध्ये ही गुंतवणूक होत असल्यामुळे शेअर मार्केटमधील हालचाल, व्यवहार वाढत आहेत. गुंतवणुकीच्या प्रमाणात काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढतात तर काहींच्या कमी होतात. म्हणजेच भारतात सर्वात मोठा शेअर बाजार महाराष्ट्रात असल्यामुळे ही गुंतवणूक आपल्या राज्यामध्येच येत आहे. fdi Maharashtra खेरीज आधी उल्लेख केल्याप्रमाणे सेवाक्षेत्रांमधील गुंतवणूक वाढत असल्याचा मोठा लाभ राज्याला मिळत आहे. यामध्ये वित्त सेवा, बँकिंग, विमा यात जवळपास १६ टक्के गुंतवणूक झाली असून त्यातील मोठा भाग महाराष्ट्रालाच लाभला आहे. कारण अनेक मोठ्या कंपन्या वा बँकांची मुख्य कार्यालये महाराष्ट्रातच आहे.
दुसरे क्षेत्र संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे आहे. यातही पाहिले आणि तुलना केली तर कर्नाटकपेक्षा आपल्या राज्यातील गुंतवणूक अधिक दिसते. महाराष्ट्रात अनेक आयटी कंपन्यांमध्ये होणारी थेट परकीय गुंतवणूक समाधानकारक आहे. आयटी क्षेत्राशी संबंधित अनेक छोट्या कंपन्याही राज्यामध्ये विकसित झाल्या असून त्या परकीय कंपन्यांकडून विकत घेतल्या जातात वा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय पैसा ओतला जातो. fdi Maharashtra या बाबतीतही आपण कर्नाटकच्या पुढे आहोत. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये फोन, वायफाय सेवा या सर्वांचा समावेश असून त्यातही थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण चांगले राहिलेले दिसून येते. इथे लक्षात घ्यायला हवे की, महाराष्ट्र हे देशामधील विकासाबाबत प्रमुख राज्य असून देशाला सर्वाधिक राष्ट्रीय सकल उत्पादन महाराष्ट्रातून जाते. यातील राज्याचे योगदान जवळपास १५ ते १६ टक्के इतके आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राची कामगिरीही प्रथम क्रमांकाची आहे. त्यामुळेच परकीय गुंतवणूक प्राधान्याने महाराष्ट्रातच होते. fdi Maharashtra ऑटोमोबाईल क्षेत्रातील देशातील ३५ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, ट्रॅक्टर्स तयार करणारी जॉन डीअर यासारखी कंपनी महाराष्ट्रात आहे. स्वाभाविकच त्यांची संशोधन आणि विकास केंद्रे याच राज्यात आहे. वोक्सवॅगनही महाराष्ट्रातच आहे.
या कंपन्या ताकद आणि उत्पादन क्षमता वाढवत राहतात. कारण इथे तयार होणा-या गाड्या आशियाई देशांमध्ये विकल्या जात असतात. आता इथे हार्ले डेव्हिडसनदेखील येत आहे. याबरोबरच अनेक कंपन्या या मोठ्या कंपन्यांना लागणारा माल तयार करण्याचे उद्योग सुरू करतात आणि त्यांचीही ताकद वाढती असते. fdi Maharashtra सध्या विजेवर चालणा-या वाहनांचे उत्पादन वाढत आहे. त्यातही महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असल्यामुळे यात होणारी गुंतवणूक लक्षवेधी आहे. त्यामुळेही महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणूक वाढत आहे. फार्मा हे देखील थेट परकीय गुंतवणूक राज्यात आणणारे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. ‘सन फार्मा' सारख्या कंपन्या गुजरातमध्ये असल्या तरी ल्यूपीन, मॅनीटॅब यासारख्या कंपन्या महाराष्ट्रातच आहेत. प्लांट बाहेर असले तरी त्यांच्यातली गुंतवणूक महाराष्ट्रातच होते. तसेच आरोग्य क्षेत्राला लागणारी उपकरणे तयार करणा-या काही कंपन्या महाराष्ट्रात आहेत. खेरीज अन्नधान्य प्रक्रिया हे राज्यातील बहरणारे क्षेत्र असून त्यात होणारी थेट परकीय गुंतवणूक मोठी आहे.
fdi Maharashtra हे सर्व मुद्दे महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरणारे आहेत. मुख्यमंत्रिपदी असताना दावोस येथे ३० हजार कोटी रुपयांच्या करारांवर देवेंद्र फडणवीस यांनी सह्या केल्या होत्या. हा प्रतिसाद अतिशय चांगला होता. त्यावेळी मायक्रोसॉफ्टच्या डाटा सेंटरसाठीच ३ हजार २०० कोटींची गुंतवणूक होणार होती. अन्नप्रक्रियेमध्ये आईस्क्रीमसारख्या क्षेत्रात ‘हॅव मोअर' कंपनी पुण्यामध्ये आईस्क्रीम निर्मितीचा प्लांट सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले होते. हे प्रकल्प सुरू झाले की नाही, हे ठाऊक नाही, fdi Maharashtra पण असे प्रकल्प राज्याच्या परकीय गुंतवणुकीमध्ये मोलाची भर घालत असतात. त्यामुळे असे अधिकाधिक प्रकल्प राज्यात येतील आणि राज्य सरकारकडून त्यांना व्यवसायासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.